'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शालिनी वहिनीची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 07:00 AM2022-01-25T07:00:00+5:302022-01-25T07:00:00+5:30

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata)मधील शालिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar)ने साकारली आहे.

Famous actress is the sister of 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' fame Shalini Vahini Aka Madhavi Nimkar | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शालिनी वहिनीची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील शालिनी वहिनीची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत शालिनी वहिनीची भूमिका अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) हिने साकारली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे ही माधवी निमकरची मावस बहिण आहे हे फारच कमी लोकांना माहित आहे.

शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकरचा १७ मे १९८२ रोजी खोपोली, रायगड जिल्ह्यात जन्म झाला. माधवी अभिनय क्षेत्रात तिची मावस बहिण सोनाली खरेमुळेच आली आहे. कारण सोनाली खरेच्या शूटिंगवेळी माधवीदेखील तिच्यासोबत शूटिंगला जायची. तिथूनच तिच्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली.


२००९ साली 'बायकोच्या नकळत' या चित्रपटातून माधवी निमकरने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर असा मी तसा मी या चित्रपटात तिने काम केले. त्यानंतर नवरा माझा भवरा, सगळं करून भागलं, धावा धाव, संघर्ष या चित्रपटातून ती विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. सध्या ती शालिनीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
सोनाली खरेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने सावरखेड एक गाव, हृदयांतर, स्माईल प्लिज, वेलडन बेबी,तेरे लिये, चेकमेट यासारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीतला अभिनेता बिजय आनंदसोबत लग्न केले. अभिनेता बिजय आनंद लोकप्रिय अभिनेता आहे. आजही तो मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम करताना दिसतो.

Web Title: Famous actress is the sister of 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' fame Shalini Vahini Aka Madhavi Nimkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.