...या टीव्ही स्टार्सची केली शोमधून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 09:13 AM2017-04-11T09:13:55+5:302017-04-11T15:35:23+5:30
सध्या टीव्ही जगतात चर्चेचा विषय ठरत असलेली एकेकाळची ‘अंगुरी भाभी’ ऊर्फ शिल्पा शिंदे जबरदस्त वादाच्या भोवºयात आहे. कारण तिने ...
जिया माणिक
‘गोपी बहू’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जिया माणिक हिने कित्येक वर्ष ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. मात्र जेव्हा ती कलर्स या चॅनलवरील ‘झलक दिखला जा’ या शोबरोबर जोडली गेली, तेव्हा निर्मात्यांनी तिला काहीही कारण न देताच ‘साथ निभाना साथिया’मधून बाहेरचा रस्ता दाखविला. याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
सोनारिका भदौरिया
‘देवो के देव महादेव’ या धार्मिक मालिकेत पार्वतीची भूमिका साकारून जबरदस्त प्रसिद्ध झालेली सोनारिका भदौरिया ही त्यावेळेस चर्चेत आली जेव्हा तिची शोमधून हकालपट्टी करण्यात आली होती. असे म्हटले जाते की, सोनारिका सेटवर जरा जास्तच नखरे करीत होती. लुक्स आणि तिच्या कॉस्ट्यूम्सवरून तिने प्रॉडक्शन हाउसला अक्षरश: सळो का पळो करून सोडले होते. अखेर निर्मात्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखविला. गेल्या वर्षी सोनारिकाने ‘सांसे’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला आहे.
करण सिंग ग्रोवर
अभिनेत्री बिपाशा बसूचा पती करण सिंग ग्रोवर याला आपल्या अन्प्रोफेशन अॅटिट्यूडमुळे ‘दिल मिल गए’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मालिकेच्या शूटिंगदरम्यान बºयाचदा करण तब्येतीचे कारण देत सेटवर येत नव्हता. तसेच निर्मात्यांना कुठल्याही सूचना न देताच हॉलिडेवर जात होता. करणच्या याच नखºयांमुळे निर्मात्यांनी त्याची मालिकेतून हकालपट्टी केली होती.
दृष्टी धामी
‘झलक दिखला जा’ या शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेली दृष्टी धामी हिला २०१४ मध्ये शोमधून बाहेर काढण्यात आले होते. दृष्टी या शोची होस्ट म्हणून काम करीत होती. परंतु ती तिच्या कामात अयशस्वी ठरल्याचे कारण देत तिला शोमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. दृष्टीच्या जागी मनील पॉल याला संधी दिली गेली.
तनीषा मुखर्जी
‘बिग बॉस - ७’ नंतर तनीषा मुखर्जी ‘गॅँग्स आॅफ हंसीपूर’ या कॉमेडी शोमध्ये बघावयास मिळाली. मात्र प्रेक्षकांना हसविण्यात तनीषा अयशस्वी ठरल्याने तिला शोमधून बाहेर काढण्यात आले होते.
प्रत्युषा बॅनर्जी
‘बालिका वधू’मधील आनंदी ऊर्फ प्रत्युषा बॅनर्जी हिचादेखील या यादीत समावेश आहे. प्रत्युषा वारंवार तब्येतीचे कारण देत शूटिंगला दांडी मारत होती. यामुळे शो मेकर्स वैतागून गेले होते. निर्मात्यांनी याबाबत तिची समजूतही काढली होती, परंतु प्रत्युषाच्या सुट्या सुरूच असल्याने तिला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मालिकेत प्रत्युषाची भूमिका तोरल रासपुत्रा हिच्या पदरी पडली होती. प्रत्युषाने १ एप्रिल २०१६ रोजी आत्महत्त्या केली होती.