Exclusive : आम्हाला विचारा, सोफीचा ‘मिस्ट्री मॅन’ कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 17:08 IST2016-08-22T11:24:08+5:302016-08-22T17:08:20+5:30
सोफी चौधरीने अलीकडे Twitterवर एक फोटो पोस्ट केला आणि तिचे अभिनंदन करणाºयांची रीघ लागली. फोटोत सोफी एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत ...

Exclusive : आम्हाला विचारा, सोफीचा ‘मिस्ट्री मॅन’ कोण?
स फी चौधरीने अलीकडे Twitterवर एक फोटो पोस्ट केला आणि तिचे अभिनंदन करणाºयांची रीघ लागली. फोटोत सोफी एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसते आहे. ‘कान्ट वेट...’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. सोफीने हा फोटो पोस्ट केला आणि सोफी लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली. पाठोपाठ बिपाशा बसू, अमृता अरोरा, नेहा धुपिया आदींनी सोफीचे अभिनंदनही केले. अर्थात सोफीचा हा ‘मिस्ट्री मॅन’ कोण, हे मात्र कळू शकले नाही. पण आम्ही मात्र याच्या तळाशी जायचेच ठरवले आणि खूप खोदल्यानंतर आमच्या हाती लागला एक ‘एक्सक्लुसिव्ह’ फोटो. होय, त्या फोटोतील सोफीसोबतची व्यक्ति इतर कुणी नसून अभिनेता आणि सुपर मॉडेल फ्रेडी दारूवाला आहे. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे की, सोफी व फ्रेडी यांचा साखरपुडा वगैरे काहीही झालेला नाही. याचा अर्थ सोफीने तिच्या ‘मिस्ट्री मॅन’सोबतच्या त्या फोटोमागे काहीतरी व्यावसायिक कारण आहे. एकंदर काय तर सोफीचा हा एक प्रमोशन फंडा दिसतोय आणि कदाचित बिपाशा, अमृता, नेहा या तिच्या मैत्रिणीही यात सामील आहेत. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, सोफीचे लग्नबिग्न नाही तर तिचे एक ब्रॅण्ड न्यू गाणे येत आहे. अर्थात सोफीने याबाबत काहीही कन्फर्म केलेले नाही. पण सोफी अद्यापही सिंगल आहे, हे मात्र अगदी कन्फर्म आहे. तेव्हा जस्ट चिल!!
![]()
![]()