मराठी सेलेब्रिटींनी वाढविले पिडीत तरूणींचे मनोधैर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2016 12:12 PM2016-03-17T12:12:10+5:302016-03-17T06:27:55+5:30

मराठी सेलेब्रिटींनी अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पिढीत तरूणींसोबत रॅम्प वॉक करून मराठी इंडस्ट्रीला अभिमान वाटेल असेच सामाजिक कार्य केले आहे

Enthusiasticity of the victim's children increased by Marathi celebrities | मराठी सेलेब्रिटींनी वाढविले पिडीत तरूणींचे मनोधैर्य

मराठी सेलेब्रिटींनी वाढविले पिडीत तरूणींचे मनोधैर्य

googlenewsNext
 
कतर्फी प्रेमातून एसिड हल्ल्याला बळी पडलेल्या तरुणींचे मनोधैर्य उंचावण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक जाणीवेतून  'सत्व : आंतरिक बळ' या विशेष कार्यक्रमात मराठी सेलेब्रिटींनी अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पिढीत तरूणींसोबत रॅम्प वॉक करून मराठी इंडस्ट्रीला अभिमान वाटेल असेच सामाजिक कार्य केले आहे. यामध्ये नटरंग' फेम सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, सौरव गोखले, अजिंक्य देव,  अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर अशा एक से एक तगडया मराठी कलाकारांनी या पिढीत तरूणींसोबत 'रेम्प वॉक' करून त्यांना ही समाजात मोकळया वातावरणात मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे असा संदेश दिला. या कार्यक्रमाची संकल्पना आर जे श्रुती यांची होती. तर निवेदिता साबू यांनी डिझाईन केलेले आणि अस्मिता जावडेकर यांच्या ज्वेलरीमुळे प्रत्येकजण खुलून दिसत होता.नृत्यांगना नुपूर दैठणकर यांच्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. आणि शिल्पकार विवेक पाटील यांनी वाळूच्या आधारे एसिड हल्ल्याला बळी पडलेल्या युवतीचा जीवन प्रवास देखील अधिक सुंदररीत्या रेखाटला.




 

Web Title: Enthusiasticity of the victim's children increased by Marathi celebrities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.