ईला भाटे यांची 'नकुशी' मध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 13:40 IST2017-08-23T08:10:05+5:302017-08-23T13:40:05+5:30

तीन दशकं चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांची नुकशीमध्ये एंट्री होणार ...

Ella Bhate's entry in 'Nakushi' | ईला भाटे यांची 'नकुशी' मध्ये एंट्री

ईला भाटे यांची 'नकुशी' मध्ये एंट्री

न दशकं चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांची नुकशीमध्ये एंट्री होणार आहे.  या मालिकेत त्या सौरभची आई, महाविद्या या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या उत्तम अभिनयानं ही भूमिका त्या नक्कीच खुलावतील यात शंका नाही. रंगभूमीवर ईला भाटे यांची अपराधी, तुझे आहे तुजपाशी, बॅरिस्टर, कथा, यू टर्न अशी अनेक नाटकं गाजली आहेत. तर टेलिव्हिजनमध्येही त्यांनी अनेक मालिका केल्यात आहेत. दामिनी, घरकुल, अग्निहोत्र अशा अनेक मालिकांतील त्यांच्या अभिनयाला दाद मिळाली आहे. आपल्या प्रगल्भ अभिनयानं त्यांनी स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या 'नकुशी' या लोकप्रिय मालिकेत त्यांची एंट्री नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे. महाविद्या ही नकुशी मालिकेतील महत्त्वाची भूमिका आहे. सौरभ आणि नकुशी यांच्या लग्नात त्यांनीच मोडता घातला होता. आता सौरभ आणि नकुशी यांच्या नात्याबाबत त्या काय भूमिका घेतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

 नुकशी मालिकेत नुकताच कृष्णजन्माष्टमीचा सोहळा साजरा करण्यात आला. सर्व चाळकरी एकत्र येऊन कृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी करणात आली. त्याआधी नुकशीची मंगळागौर ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात. नुकशीकडे गोड बातमी असल्याने घरात एक वेगळाच उत्साह आहे.

Web Title: Ella Bhate's entry in 'Nakushi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.