​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पूचे नवे रूप तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 15:40 IST2017-09-02T10:10:15+5:302017-09-02T15:40:15+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सगळेच सण खूप उत्सवात साजरे केले जातात. या सोसायटीत सगळ्या धर्म-जातीचे लोक ...

Do you see the new look of the stage of the series, in the opposite glasses of Tarak Mehta? | ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पूचे नवे रूप तुम्ही पाहिलेत का?

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पूचे नवे रूप तुम्ही पाहिलेत का?

रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सगळेच सण खूप उत्सवात साजरे केले जातात. या सोसायटीत सगळ्या धर्म-जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. त्यामुळे प्रत्येक सणाची मजा या सोसायटीमध्ये काही औरच असते. 
सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचे वातावरण आहे. हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. गोकुळधाम सोसायटीत देखील आता गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे आणि गणेशोत्सवात प्रेक्षकांना टप्पू आणि टप्पूसेनाचे एक नवे रूप पाहायला मिळणार आहे. 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना टप्पू शिवाजी महाराजांच्या तर टप्पू सेना मराठा योद्धाच्या रूपात दिसणार आहेत. त्यामुळे या भागाचे चित्रीकरण करण्यासाठी टप्पू आणि टप्पूसेना खूपच उत्साहित होती. या मालिकेच्या टीमने काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट दिली होती. पोपटलालला एका लेखासाठी या देवळाला भेट द्यायची होती. त्यामुळे त्याच्यासोबत सोसायटीतील सगळेच गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले होते. गोकुळधाम सोसायटीमधील सगळ्यांनाच हे मंदिर, या मंदिरातील मूर्ती खूप भावली होती आणि आता याच गणपतीच्या प्रतिकृतीची ते गोकुळधाम सोसायटीत स्थापना करणार आहेत. गणेशोत्सव अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी गोकुळधाम सोसायटीमधील सगळी वरिष्ठ मंडळी मदत करणार आहेत. पण या सणाची तयारी करण्याची खरी जबाबदारी टप्पू सेना घेणार असून ते त्यांची ही जबाबदारी योग्यरितीने पार देखील पाडणार आहेत.
गोकुळधाम सोसायटीमधील सगळे वाजत गाजत गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत. ढोल ताशाच्या गजरात गोकुळधाम सोसायटीत गणेशाचे आगमन होणार आहे.  

Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेनची शाहरुख खानने घेतली काळजी

Web Title: Do you see the new look of the stage of the series, in the opposite glasses of Tarak Mehta?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.