सजन रे झुठ मत बोलोचा दुसरा सिझन लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 14:39 IST2017-04-20T09:09:32+5:302017-04-20T14:39:32+5:30

सजन रे झूठ मत बोलो या कार्यक्रमात सुमीत राघवन, टिकू तलसानिया, मुग्धा चाफेकर, अर्पणा मेहता, अमी त्रिवेदी, शालिनी खन्ना ...

Do not Say Sajay Re Do not Speak Second Season Soon | सजन रे झुठ मत बोलोचा दुसरा सिझन लवकरच

सजन रे झुठ मत बोलोचा दुसरा सिझन लवकरच

न रे झूठ मत बोलो या कार्यक्रमात सुमीत राघवन, टिकू तलसानिया, मुग्धा चाफेकर, अर्पणा मेहता, अमी त्रिवेदी, शालिनी खन्ना आणि राजीव ठाकूर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. हा कार्यक्रम संपून आता चार ते पाच वर्षं झाली आहेत. आज इतक्या वर्षांनंतरही या कार्यक्रमातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे.
दुसऱ्या सिझनवर या मालिकेच्या टीमने काम करायलादेखील सुरुवात केली आहे. पण या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची कास्ट संपूर्णपणे वेगळी असणार आहे. यात प्रेक्षकांना अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. पहिल्या सिझनमध्ये या मालिकेचा नायक आपल्या सासऱ्यांशी कशाप्रकारे खोटा बोलतो हे पाहायला मिळाले होते. या मालिकेत सुमीत राघवन आपले खोटे कुटुंब तयार करतो आणि ते टिकू तलसानिया यांना दाखवतो अशी या मालिकेची कथा होती. या खोट्या कुटुंबातील मजा मस्ती प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. 
या दुसऱ्या सिझनचे नाव सजन रे फिर झुठ मत बोलो असे असून या मालिकेत हुसैन कुवार्जेवाला प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. हुसैन हे नाव क्योंकी साँस भी कभी बहू थी, कुमकुम यांसारख्या मालिकांमुळे प्रकाशझोतात आले होते. तो अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याच्यासोबतच सना अमिन शेख या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. सनाने काही महिन्यांपूर्वी कृष्णदासी या मालिकेत काम केले होते. 

Web Title: Do not Say Sajay Re Do not Speak Second Season Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.