दिशा वकानी म्हणजेच दया सोडणार नाही तारक मेहता का उल्टा चष्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 12:23 IST2017-07-12T06:53:05+5:302017-07-12T12:23:05+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दिशा वकानी दया ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेचा ती गेल्या आठ ...

Direction Wakani means mercy will not leave | दिशा वकानी म्हणजेच दया सोडणार नाही तारक मेहता का उल्टा चष्मा

दिशा वकानी म्हणजेच दया सोडणार नाही तारक मेहता का उल्टा चष्मा

रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दिशा वकानी दया ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेचा ती गेल्या आठ वर्षांपासून भाग आहे. या मालिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. आज दया हीच तिची ओळख बनली आहे. प्रेक्षक तिच्याशिवाय या मालिकेचा विचारही करू शकत नाही.
दिशाचे 24 नोव्हेंबर 2015मध्ये मयुर पांड्यासोबत लग्न केले. मयुर हा चार्टड अकाऊंटट आहे. दिशा आज तिच्या आयुष्यात खूपच खूश आहे. दिशा लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे. ती गरोदर असल्याने मालिका सोडणार असे गेल्या काही दिवसांपासून म्हटले जात आहे. पण काहीही झाले तरी दिशा मालिका सोडणार नसल्याचे कळतेय.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालाल, दया, पोपटलाल, बबिता, आत्माराम भिडे, माधुरी भिडे या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. पण त्यातही दया ही प्रेक्षकांना अधिक आवडते. त्यामुळे दिशाने मालिका सोडल्यास त्याचा टिआरपीवर परिणाम होऊ शकतो याची चांलीच कल्पना या मालिकेच्या टीमला आहे. दिशाला सध्या सातवा महिना सुरू आहे. त्यामुळे या अवस्थेत तिला जास्त काम करायला जमत नाहीये. पण त्यातही आठवड्यातले काही तास चित्रीकरण करायला मिळत आहे आणि त्यामुळे काही दृश्यांमध्ये तरी प्रेक्षकांना तिला पाहायला मिळत आहे. पुढील काळात देखील तिला मालिकेत सतत नव्हे तर काही दृश्यांमध्ये पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. 
दिशाला बाळ झाल्यानंतरदेखील काही महिने तरी ती खूपच कमी चित्रीकरण करणार आहे. पण काहीही केल्या ती या मालिकेला रामराम ठोकणार नसल्याचे कळतेय. 

Also Read : ​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताने केली समाजसेवा

Web Title: Direction Wakani means mercy will not leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.