​दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमातील सिमरन राज आहे श्रीदेवीची चाहती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2017 06:48 AM2017-03-09T06:48:44+5:302017-03-09T12:18:44+5:30

श्रीदेवीने ऐंशी - नव्वदीच्या दशकात एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. ती केवळ एक चांगली अभिनेत्रीच नव्हे तर एक ...

Dil Hai Hindustani is the Simran Raj in this program, Sridevi's wish | ​दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमातील सिमरन राज आहे श्रीदेवीची चाहती

​दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमातील सिमरन राज आहे श्रीदेवीची चाहती

googlenewsNext
रीदेवीने ऐंशी - नव्वदीच्या दशकात एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. ती केवळ एक चांगली अभिनेत्रीच नव्हे तर एक चांगली नर्तिका देखील आहे. तिच्या अनेक चित्रपटात आपल्याला तिचे नृत्य पाहायला मिळाले आहे. श्रीदेवीने अनेक वर्षांनंतर इंग्लिश विंग्शिल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता आणि हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 
श्रीदेवीचे जगभर अनेक चाहते आहेत. दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमात लहान मुले एकापेक्षा एक सरस गाणी गाऊन सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी केवळ परीक्षकांचेच नव्हे तर प्रेक्षकांचेदेखील मन जिंकले आहे. या कार्यक्रमात सिमरन राज ही सर्वात लहान स्पर्धक आहे. सिमरन ही श्रीदेवीची खूप मोठी फॅन आहे. ती अगदी लहान असल्यापासूनच श्रीदेवीच्या मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ हे या गाण्यावर नृत्य सादर करते. दिल है हिंदुस्तानी या कार्यक्रमात आपल्या आवडत्या अभिनेत्रीवर चित्रीत झालेले गाणे गाण्याची तिची गेल्या कित्येक दिवसांपासूनच इच्छा आहे. तिने नुकतेच श्रीदेवीच्या चित्रपटातील मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ है गाणे सादर केले. श्रीदेवीलाच तिने हे गाणे समर्पित केले. या परफॉर्मन्सविषयी सिमरन सांगते, "मी श्रीदेवी मॅमची खूप मोठी फॅन आहे. त्यांचे मेरे हाथो में नौ नौ चुडिया है हे गाणे तर मला खूप आवडते. मी लहानपणापासून त्यांच्यासारखा गेटअप करून या गाण्यावर नाचते. आज हे गाणे मला या कार्यक्रमात सादर करायला मिळाले यासाठी मी खूप खूश आहे." 



Web Title: Dil Hai Hindustani is the Simran Raj in this program, Sridevi's wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.