​दिव्यांका त्रिपाठीचा पूर्वप्रियकर शरद मल्होत्रा का पडला एकटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 11:21 IST2018-05-25T05:51:49+5:302018-05-25T11:21:49+5:30

दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांचे अफेअर अनेक वर्षं सुरू होते. बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेच्या सेटवर त्यांच्या ...

Deepika Padukone's prelude to Sharad Malhotra's loneliness alone? | ​दिव्यांका त्रिपाठीचा पूर्वप्रियकर शरद मल्होत्रा का पडला एकटा?

​दिव्यांका त्रिपाठीचा पूर्वप्रियकर शरद मल्होत्रा का पडला एकटा?

व्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांचे अफेअर अनेक वर्षं सुरू होते. बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेच्या सेटवर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. ते दोघे लग्न करतील असेच सगळ्यांना वाटले होते. पण अफेअरच्या सात-आठ वर्षांनंतर दिव्यांका आणि शरद यांचे ब्रेकअप झाले. दिव्यांका शरद यांचे नाते तुटल्यानंतर दिव्यांका अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होती. शरद तिच्या आयुष्यात नाहीये ही गोष्ट ती पचवूच शकत नव्हती. कालांतरांने तिने तिचे संपूर्ण लक्ष करियरमध्ये गुंतवण्याचे ठरवले. ये है मोहोब्बते ही मालिका त्याच काळात सुरू झाली. या मालिकेतील इशिता या व्यक्तिरेखेमुळे दिव्यांकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. व्यवसायिक आयुष्यात सगळे काही आलबेल सुरू असतानाच याच मालिकेतील तिचा सहकलाकार विवेक दहिया तिच्या आयुष्यात आला आणि काहीच महिन्यात त्या दोघांनी लग्न केले. दिव्यांका आज तिच्या आयुष्यात प्रचंड खूश आहे. पण शरदसोबत ब्रेक अप झाले तो काळ तिच्यासाठी अतिशय वाईट असल्याचे तिने नुकतेच राजीव खंडेलवालच्या ‘जजबात… संगीन से नमकीन तक’ या कार्यक्रमात सांगितले होते.
दिव्यांका आणि शरद यांचे ब्रेकअप झाल्यानंतर शरद आणि पूजा बिष्ट यांचे अफेअर सुरू झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते दोघे नात्यात होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. त्या दोघांच्या कुटुंबियांनी आणि मित्रमैत्रिणींनी देखील त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघे आपल्या मतावर ठाम आहेत. याविषयी बॉम्बे टाइम्सशी बोलताना शरदने ब्रेकअपविषयी कबुली दिली. त्याने या वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले, पूजा एक खूप चांगली मुलगी आहे. माझ्या अपेक्षा तिच्याकडून जास्त असल्याने अनेक वेळा आमच्यात वाद होत असत. माझ्यामुळेच हे नाते संपुष्टात आले आहे. मी अनेकवेळा आमच्या नात्यातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. पूजाला तिच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा.

Also Read : पालक बनण्याची दिव्यांका आणि विवेक यांची अद्याप तयारी नाही!

Web Title: Deepika Padukone's prelude to Sharad Malhotra's loneliness alone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.