दिपिका सिंगने बाळाचे केले 'नामकरण'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 16:30 IST2017-07-06T11:00:26+5:302017-07-06T16:30:26+5:30
बाळाचा फोटो पाहताच चाहत्यांनी दीपिका सिंहवर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.आता पुन्हा तिने तिच्या बाळाचा एक फोटो टाकला आहे.

दिपिका सिंगने बाळाचे केले 'नामकरण'
' ;दिया और बाती' मालिकेमधून घराघरात पोहचलेली संध्या बिंदनी म्हणजेच दिपिका सिंह ख-या आयुष्यात आई बनल्यानंतर खूप बिझी झाली आहे. संध्या बिंदनी म्हणून लोकप्रिय ठरलेली दीपिका सिंह आता तिच्या बाळाला संपूर्ण वेळ देतेय.बाळाची नीट काळजी घेता यावी म्हणून ती काही महिने तरी मालिकेचे शूटिंग करणार नाही. काही दिवसांपूर्वीच चाहत्यांच्या सांगण्यावरून तिने तिच्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता.बाळाचा फोटो पाहताच चाहत्यांनी दिपिका सिंहवर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.आता पुन्हा तिने तिच्या बाळाचा एक फोटो टाकला आहे.आणि हा फोटो आता थोडा खास आहे.कारण तिने तिच्या बाळाचे नामकरण केले आहे. या बाळाचे नाव तिने सोहम ठेवले असून सोहम रोहित गोयल या नावाने तो ओळखला जाणार असे दिपिकाने सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले आहे.
'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच 'दिया और बाती हम' या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं. त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिया और बाती या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला.