'पलटन' चित्रपटातून आणखीन एक टीव्ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 11:01 IST2018-02-10T05:30:59+5:302018-02-10T11:01:37+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री डेब्यूच्या तयारीत आहेत. कंगना राणौतच्या मणिकर्णिकामध्येू अंकिता लोखंडे, गोल्डमधून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये एंट्रीसाठी ...

Debut is another Bollywood actress from Bollywood film 'Paltan' | 'पलटन' चित्रपटातून आणखीन एक टीव्ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये डेब्यू

'पलटन' चित्रपटातून आणखीन एक टीव्ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये डेब्यू

्या बॉलिवूडमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री डेब्यूच्या तयारीत आहेत. कंगना राणौतच्या मणिकर्णिकामध्येू अंकिता लोखंडे, गोल्डमधून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये एंट्रीसाठी सज्ज आहे. या लिस्टमध्ये आता आणखीन एक नाव सामील होणार आहे. ते म्हणजे ससुराल सिमर का फेम दीपिका कक्कर हिचे.  

दीपिकाने सोशल मीडियावर स्वत: ही माहिती दिली. जेपी दत्त यांचा आगामी चित्रपट पलटनमधून ती डेब्यू करते आहे. हा चित्रपट जवानांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट एक युद्धकथा आधारित आहे, ६० च्या दशकातील भारत-चीन युद्धावर हा चित्रपट. यात हर्षवर्धन राणे, अर्जुन रामपाल, गुरमीत चौधरी, सिद्धांत कपूर, सोनल चौहान आणि इशा गुप्ता दिसणार आहेत. 

दीपिकाने ट्वीट करुन सांगितले की, ''यापेक्षा जास्त चांगले काय होऊ शकते कि माझा पहिला चित्रपट जेपी दत्त यांच्यासोबत आहे. पलटनचा भाग बनून मला सन्मानित झाल्यासारखे वाटते आहे.'' पलटनची शूटिंग सध्या चंडीगढमध्ये चालू आहे. याआधी जेपी 'दत्ता बॉर्डर' आणि 'एलओसी करगिल' सारखे चित्रपट बनवले आहेत. 
 
दिपिका कक्कर अनेक वर्षं ससुराल सिमर का या मालिकेत काम करत होती. या मालिकेत शोएब इब्राहिम तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकत होता. या मालिकेच्या सेटवरच शोएब आणि दिपिका एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी आपल्या नात्याची कबुली अनेकवेळा मीडियासमोर दिली असून शोएबने मीडियासमोर दिपिकाशी लग्न करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे. गेल्या तीन-साडे तीन वर्षांपासून ते एकमेंकांना डेट करत आहेत. दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने नच बलिये या कार्यक्रमात देखील एकत्र भाग घेतला होता. या कार्यक्रमानंतर आता ते दोघे लग्न कधी करणार हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. यावर दीपिकाने आम्ही लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहोत. आम्ही याविषयी सगळ्यांना लवकरच सांगणार आहोत असे सांगितले होते. आमच्या आयुष्यात आमचे फॅन्स हे अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांना आम्ही लग्नाबाबत सगळ्यात पहिल्यांदा सांगायचे असे ठरवले आहे. कोई लौट के आया है या मालिकेत देखील दिपिका आणि शोएबने एकत्र काम केले होते. या मालिकेतील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडली होती. 

Web Title: Debut is another Bollywood actress from Bollywood film 'Paltan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.