संकट मोचन महाबली हनुमान या मालिकेने पूर्ण केले 500 भाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 10:19 IST2017-02-20T04:49:40+5:302017-02-20T10:19:40+5:30
संकट मोचन महाबली हनुमान या मालिकेत प्रेक्षकांना हनुमानाची गाथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत हनुमानच्या लहानपणापासून ते रामाच्या भेटीपर्यंतची ...
संकट मोचन महाबली हनुमान या मालिकेने पूर्ण केले 500 भाग
स कट मोचन महाबली हनुमान या मालिकेत प्रेक्षकांना हनुमानाची गाथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत हनुमानच्या लहानपणापासून ते रामाच्या भेटीपर्यंतची आजवर दाखवली गेली आहे. या पुढे मालिकेत प्रेक्षकांना सीताहरण, त्यानंतर हनुमानाने अशोकवाटिकेत जाऊन घेतलेली सीतेची भेट, समुद्रावर बांधलेला सेतू, सीतेनी दिलेली अग्निपरीक्षा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ही मालिका सुरू होऊन आता जवळजवळ दोन वर्षं होत आहेत. या मालिकेतील सगळ्या कलाकारांच्या परफॉर्मन्सने आणि मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहेत. ही मालिका गेली दोन वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने आता नुकतेच 500 भाग पूर्ण केले आहेत. या 500 भागानंतर प्रेक्षकांना मालिकेत राम आणि हनुमान लंकेत गेल्याचे आणि सीतेला परत आणण्यासाठी रावणासोबत केलेले युद्ध पाहायला मिळणार आहेत. या मालिकेचे निर्माते अभिमन्यू सिंग सांगतात, "आमच्या प्रोडक्शन हाऊसची ही पहिलीच पौराणिक मालिका आहे. पण आमच्या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी मी त्यांचा आभारी आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासून आम्हाला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या मालिकेची कथा, सगळ्यांचे अभिनय प्रेक्षकांना पसंत पडत आहेत. आतापर्यंतचा या मालिकेचा प्रवास खूपच छान आहे. मी माझ्या संपूर्ण टीमचे यासाठी आभार मानतो. भविष्यातही अशाचप्रकारे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत."
या मालिकेच्या टीमने केक कापून त्यांचा हा आनंद व्यक्त केला. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती आणि विशेष म्हणजे नेहमी आपल्या गेटअपमध्ये दिसणारे कलाकार या सेलिब्रेशनला मॉडर्न कपड्यांमध्ये दिसले.
या मालिकेच्या टीमने केक कापून त्यांचा हा आनंद व्यक्त केला. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती आणि विशेष म्हणजे नेहमी आपल्या गेटअपमध्ये दिसणारे कलाकार या सेलिब्रेशनला मॉडर्न कपड्यांमध्ये दिसले.