Coronavirus UNLOCK 1: या अभिनेत्रीने कोरोनाचा घेतलाय धसका,वर्षभर करणार नाही काम, म्हणाली जान है तो जहाँ है !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 03:31 PM2020-06-09T15:31:39+5:302020-06-09T15:38:02+5:30

लॉकडाऊन उठवल्यानंतर परिस्थीती अतिशय भयावह होणार आहे. त्यात पावसाळा सुरू होणार. अनेक साथीच्या आजाराना निमंत्रण देण्यासारखेच आहे.

Coronavirus UNLOCK 1: Actress Erica Fernandes will not Return to Sets As She Fears Spike In Covid 19 Cases | Coronavirus UNLOCK 1: या अभिनेत्रीने कोरोनाचा घेतलाय धसका,वर्षभर करणार नाही काम, म्हणाली जान है तो जहाँ है !

Coronavirus UNLOCK 1: या अभिनेत्रीने कोरोनाचा घेतलाय धसका,वर्षभर करणार नाही काम, म्हणाली जान है तो जहाँ है !

googlenewsNext

महाराष्ट्र सरकारने शूटिंग सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर मुंबईतील स्टुडिओमध्ये पुन्हा लाईटस, कॅमेरा आणि अॅक्शन असा आवाज घुमु लागला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अनेकजण घरातच बंदिस्त होते. सगळे उद्योगधंदे बंद झाले होते. त्याचप्रमाणे शूटिंगदेखील बंद झाले होते.  लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी जे कलाकार शहराबाहेर गेले होते तेच पुन्हा एकदा मुंबईकडे परतत आहेत. कोरोनामुळे आता पूर्वीप्रमाणे मोकळेपणाने काम करणे शक्य नाही.

अनेक नियम अटींसह कलाकारांनाही काम करावे लागणार आहे. तसेच 
काही कलाकार अजूनही सेटवर जायला घाबरत आहेत.कारण लॉकडाऊन हटवले असले तरीही कोरोनाचे संकट अजूनही आपल्यावर आहे. त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल तर घरातच थांबणे जास्त सुरक्षित आहे. 

''कसौटी जिंदगी की''..... फेम एरिका फर्नांडिसने वर्षभर शूटिंग करणार नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या वर्षअखेरीस मी कामाला सुरूवात करेन तोपर्यंत कोरोनाबरोबर काम करण्याची माझी सध्या तरी तयारी नसल्याचे तिने म्हटले आहे.

लॉकडाऊन सुरू होते तरीही आपल्याकडे कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. आता लॉकडाऊन उठवल्यानंतर परिस्थीती अतिशय भयावह होणार आहे. त्यात पावसाळा सुरू होणार. अनेक साथीच्या आजाराना निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे आणखीन काही दिवस बाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे.

इतरांची तयारी असेल कोरोना बरोबर जगण्याची पण माझी तयारी नाही कोरोनाबरोबर जगण्याची. त्यामुळे परिस्थीती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा कामाला जोमाने सुरूवात करेल असे तिने म्हटले आहे.
 

Web Title: Coronavirus UNLOCK 1: Actress Erica Fernandes will not Return to Sets As She Fears Spike In Covid 19 Cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.