Chala Hawa Yeu Dya: किशोरी पेडणेकरांनी सांगितला चिठ्ठीचा 'तो' भन्नाट किस्सा, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:30 PM2022-07-19T12:30:34+5:302022-07-19T12:31:08+5:30

Chala Hawa Yeu Dya: चला हवा येऊ द्या शोच्या मंचावर या आठवड्यात राजकारण्यांचा खेळ रंगणार आहे.

Chala Hawa Yeu Dya: Kishori Pednekar told the amazing story of Chitthi, the video is going viral | Chala Hawa Yeu Dya: किशोरी पेडणेकरांनी सांगितला चिठ्ठीचा 'तो' भन्नाट किस्सा, व्हिडीओ होतोय व्हायरल

Chala Hawa Yeu Dya: किशोरी पेडणेकरांनी सांगितला चिठ्ठीचा 'तो' भन्नाट किस्सा, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) शोच्या मंचावर या आठवड्यात राजकारण्यांचा खेळ रंगणार आहे. सगळं ओक्केमध्ये या डायलॉगने ज्यांना ओळख दिली असे शहाजी पाटील, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर ही मान्यवर मंडळी या मंचावर उपस्थित राहणार आहेत. बऱ्याच राजकीय तणावानंतर ही मंडळी एका मंचावर धमाल करायला एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील काही किस्से सुद्धा शेअर केले. यातील किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर चला हवा येऊ द्या शोचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत किशोरी पेडणेकर यांनी आपली लव्हस्टोरी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या प्रेम कहाणीमध्ये एकदा भावाच्या धाकाने त्यांना लिहिलेली चिठ्ठी खाऊन टाकावी लागली होती, असे त्यांनी सांगितले.


या व्हिडीओत किशोरी पेडणेकर सांगताना दिसत आहेत की, मला माझ्या प्रेम कहाणीमधला एक किस्सा आठवतो. एकदा सगळे घरी असताना मला त्यांनी घाईघाईत चिट्टी दिली आणि ती खाली पडली. ती नेमकी माझ्या भावाने पाहिली. मला कळले की आता हा विचारणार. त्याला कळू नये म्हणून दिलेली चिठ्ठी मला खाऊन टाकावी लागली.


किशोरी पेडणेकर यांना त्यांच्या लग्नाआधी पतीकडून मिळालेली चिठ्ठी कोणाला दाखवावी लागू नये म्हणून खाऊन टाकावी लागल्याचा भन्नाट किस्सा त्यांनी सांगितला. या भागात शहाजी पाटील यांचा लोकप्रिय डायलॉगसुद्धा ऐकायला मिळणार आहे. तसेच राजकारणाऱ्यांचं मजेदार आयुष्य, त्यांच्या काही खाजगी गंमतशीर गोष्टी सुद्धा ऐकायला मिळणार आहेत.

Web Title: Chala Hawa Yeu Dya: Kishori Pednekar told the amazing story of Chitthi, the video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.