बॉलिवूडची 'चांदनी'श्रीदेवी यांना 'रायझिंग स्टार 2'च्या मंचावर वाहण्यात येणार श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 14:31 IST2018-03-03T09:01:32+5:302018-03-03T14:31:32+5:30
जेव्हा विख्यात सिनेनिर्माते राज कपूर यांनी 10 वर्षे वयाच्या अलका याग्निकचे गाणे ऐकले तेव्हा ते तिच्या आवाजावर मोहित झाले ...
.jpg)
बॉलिवूडची 'चांदनी'श्रीदेवी यांना 'रायझिंग स्टार 2'च्या मंचावर वाहण्यात येणार श्रद्धांजली
ज व्हा विख्यात सिनेनिर्माते राज कपूर यांनी 10 वर्षे वयाच्या अलका याग्निकचे गाणे ऐकले तेव्हा ते तिच्या आवाजावर मोहित झाले होते.या लहान मुलीने तिच्या करियर मध्ये 2000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत आणि जगभरातील लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तिच्या करियरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये देशात धूम करणारा तिचा आवाज नवीन गुणवान कलावंतांना सुद्धा प्रोत्साहित करत आला आहे आणि आता ती 'रायझिंग स्टार 2'चा मंच भूषविणार आहे.भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय शो असणारा रायझिंग स्टार 2 आता यशोशिखारवर येऊन पोहचला आहे.आजच्या काळातील सर्वात जास्त आवडत्या आणि प्रशंसा झालेल्या शो मधील एक असलेला रायझिंग स्टार 2 वर या आठवड्याची अतिथी म्हणून अलका याग्निक येणार आहेत आणि त्या लाइव्ह परफॉर्म करताना नवीन गुणवंतांवर येणाऱ्या ताणाचा अनुभव घेणार आहेत.या आठवड्यातील शो वरील गुणवंत विख्यात श्रीदेवीला आदरांजली वाहणार आहेत आणि तिच्या सिनेमा मधील काही सुंदर गाणी पेश करणार आहेत.रायझिंग स्टार 2 वर अतिथी पाहुणे म्हणून येण्याविषयी अलका याग्निक यांच्या कडे चौकशी केली असता त्या म्हणाल्या, “लाइव्ह गायन करण्याची संकल्पना अतिशय आकर्षक आहे, मी अनेक गायनाच्या रिअॅलिटी शो वर परीक्षक म्हणून काम केले आहे, पण रायझिंग स्टार 2 हा त्यापेक्षा अतिशय वेगळा असून त्यात जास्तीत जास्त प्रेक्षकांचा सहभाग असेल अशी व्यवस्था केलेली आहे. शो वरील या वैशिष्ट्यपूर्ण गुणवंतांना ऐकण्यासाठी रायझिंग स्टार 2च्या टीमने मला आमंत्रित केले यासाठी मी त्यांची आभारी आहे.”अलका याग्निक 'रायझिंग स्टार 2' खास एपिसोड मध्ये अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच या विशेष भागात श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
![]()