राखी सावंतने अभिनव शुक्लाच्या नावाने कुंकू भरताच अशी होती त्याची पत्नी रुबिना दिलाईकची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 06:47 PM2021-01-14T18:47:10+5:302021-01-14T18:48:58+5:30

राखीचे लग्न झाले असे तिने म्हटले असले तरी आता बिग बॉसच्या घरात ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.

Bigg Boss 14 Rakhi Sawant put sindoor for Abhinav shukla | राखी सावंतने अभिनव शुक्लाच्या नावाने कुंकू भरताच अशी होती त्याची पत्नी रुबिना दिलाईकची अवस्था

राखी सावंतने अभिनव शुक्लाच्या नावाने कुंकू भरताच अशी होती त्याची पत्नी रुबिना दिलाईकची अवस्था

googlenewsNext
ठळक मुद्देराखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटले जाते. ती बिग बॉसच्या घरात देखील ड्रामा करताना दिसत आहे. ती अभिनवच्या सतत मागे पुढे करत असते. आता तर तिने अभिनवच्या नावाने कुंकू भरले आहे.

बिग बॉस १४ मध्ये आपल्याला आतापर्यंतच्या सिझनमध्ये दिसलेले काही सेलिब्रेटी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये झळकत आहे. पूर्वीच्या सिझनमध्ये राखीमुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे.

राखी सावंतचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. तिचा नवरा युकेमध्ये राहातो. तो लवकरच बिग बॉसच्या घरात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. राखीचा पती कधीच लोकांच्या समोर आलेला नाहीये. त्यामुळे तो कसा दिसतो हे कोणालच माहीत नाहीये. राखीचे लग्न झाले असे तिने म्हटले असले तरी आता बिग बॉसच्या घरात ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. राखी अभिनव शुक्लाच्या प्रेमात पडली आहे. अभिनवचे लग्न झालेले असून त्याची पत्नी रुबीना दिलाईक देखील बिग बॉसच्या घरात त्याच्यासोबत आहे. 

राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटले जाते. ती बिग बॉसच्या घरात देखील ड्रामा करताना दिसत आहे. ती अभिनवच्या सतत मागे पुढे करत असते. आता तर तिने अभिनवच्या नावाने कुंकू भरले आहे. कलर्स टीव्हीच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला एक व्हिडिओ पाहायला मिळतोय. त्यात राखी अभिनवच्या नावाने भांगेत कुंकू भरताना दिसत असून त्याला आय लव्ह यू म्हणताना दिसत आहे. तसेच गाणे म्हणत अभिनवचे पाय पकडत आहे आणि त्याला कुठे जाऊ नकोस असे सांगत आहे. हा सगळा प्रकार रुबिनासमोरच सुरू आहे. एवढेच नव्हे तर एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो अभिनव बाबू असे म्हणत आहे. त्यावर अभिनव दीड रुपये असे तिला मस्करीत म्हणताना दिसत आहे. यावर राखी हसताना दिसत आहे तर रुबिनाचे तोंड पडलेले दिसत आहे.   

Web Title: Bigg Boss 14 Rakhi Sawant put sindoor for Abhinav shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.