Bigg Boss 10:सनी लिओनीसह 'लैला' गाण्यावर थिरकणार सलमान खान -शाहरूख खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2017 16:36 IST2017-01-17T16:59:00+5:302017-01-18T16:36:28+5:30

सध्या 'रईस' म्हणजे शाहरूख आणि लैला म्हणजे सनी लिओनी चांगलेच धुमाकुळ घालताना दिसतायेत.जिकडे बघावे तिकडे शाहरूख आणि सनी लिओनीची ...

Bigg Boss 10: Salman Khan - Shahrukh Khan, who will star on 'Layla' with Sunny Leone | Bigg Boss 10:सनी लिओनीसह 'लैला' गाण्यावर थिरकणार सलमान खान -शाहरूख खान

Bigg Boss 10:सनी लिओनीसह 'लैला' गाण्यावर थिरकणार सलमान खान -शाहरूख खान

्या 'रईस' म्हणजे शाहरूख आणि लैला म्हणजे सनी लिओनी चांगलेच धुमाकुळ घालताना दिसतायेत.जिकडे बघावे तिकडे शाहरूख आणि सनी लिओनीची चर्चा होतेय. आता हीच पब्लिसीटी इनकॅश करण्यासाठी सनी लिओनीसह शाहरूख खान बिग बॉस 10च्या घरात एंट्री मारणार आहे.बिग बाॉस 10च्या  येणा-या भागात सनी लिओनी शाहरूख खानसह थिरकणार असून या परफॉर्मन्सला चारचाँद लावण्यासाठी दंबग सलमान खानसुद्धा या दोघांना या परफॉर्मन्सवेळी साथ देणार आहेत. बिग बॉस 10च्या घरात 'रईस' सिनेमाच्या प्रोमोशनचे प्रोमोही टीव्हीवर झळकतायेत.बिग बॉस या शोसह सनी लिओनीचे एक खास नातंही आहे. कारण बिग बॉसमुळेच सनी लिओनी प्रकाशझोतात आली होती. बिग बॉसच्या घरात मिळालेल्या पॉप्युलारिटीमुळेच आज सनी लिओनी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करू शकली आहे.सनी लिओनीचे 'लैला मै लैला' याच गाण्यावर बिग बॉसच्या घरातही थिरकणार असल्यामुळे हा भाग रंजक होणार हे मात्र नक्की.


या गाण्यात सनीचा हॉट अंदाज नजर वेधून घेणारा आहे. या गाण्याचा रिमेक राम संपत यांनी केला असून, हे गाणे पवनी पांडे हिने गायले आहे.शाहरुख खानच्या आगामी रईस या चित्रपटाबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.'रईस' ‘लैला मै लैला’या गाण्याची रिलीजपूर्वीच तुफान लोकप्रिय ठरले होते.त्यामुळे आता सिनेमा रिलीजपर्यंत या गाण्याची क्रेझ आथा शिगेला पोहचल्याचे पाहायला मिळतंय. या गाण्याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळाली होती.  तसेच रईस सिनेमा 2०१६ साली आतापर्यंत सर्वाधिक पाहण्यात आलेला हा ट्रेलरही ठरला आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी व माहिरा खान यांची प्रमुख भूमिका असणारा रईस हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: Bigg Boss 10: Salman Khan - Shahrukh Khan, who will star on 'Layla' with Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.