बाप रे बाप.... घरात आला साप.... स्वामींच्या डोक्याला ताप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 16:50 IST2016-11-07T16:25:25+5:302016-11-07T16:50:02+5:30
बिग बॉसच्या घरात एका अनाहूत पाहुण्याची एंट्री झाली. एरव्ही प्रत्येक पाहुण्याचे घरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करणारे बिग बॉसच्या ...
.jpg)
बाप रे बाप.... घरात आला साप.... स्वामींच्या डोक्याला ताप...
ब ग बॉसच्या घरात एका अनाहूत पाहुण्याची एंट्री झाली. एरव्ही प्रत्येक पाहुण्याचे घरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करणारे बिग बॉसच्या घरातील सदस्य या पाहुण्याला पाहून चांगलेच घाबरले. प्रत्येक जण भीतीने म्हणत होता बाप रे बाप. त्याचे झाले असे की बिग बॉसच्या घरात आलेला अनाहूत पाहुणा म्हणजे साप. या सापाला पाहून घरातील प्रत्येकाचीच बोबडी वळली. साप बघून घरातील प्रत्येकाच्या तोंडचे पाणीच पळाले. एरव्ही शेखी मिरवणारे आणि बोलबच्चन करणारे स्वामी ओम यांना तर या सापाने जणू काही सळो की पळो करुन सोडले. सापाला पाहून स्वामीजींनी चक्क लुंगी डान्स केल्याचे बोलले जात आहे. आता स्वामींनी खरोखर लुंगी डान्स केला असे तुम्हाला वाटत असेल. मात्र हा लुंगी डान्स नसून साप पाहून स्वामीजी लुंगी वर घेऊन धावू लागले. घरात घुसलेला साप आणि स्वामीजींची ही धावपळ बिग बॉसच्या भागात प्रसारीत करण्यात आली नाही. मात्र स्वामींजींची अशी भंबेरी उडालेली पाहून त्यांचे पाय खेचण्याची संधी शोचा होस्ट सलमान खानने काही सोडली नाही. नुकतंच प्रसारीत झालेल्या बिग बॉसच्या भागात सलमान सापाचा किस्सा सांगून स्वामी ओम यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. स्वामीजींनी लुंगी आणखी वर उचलली असती साप भलत्याच जागी शिरला असता असं सलमाननं म्हटलं. सलमानच्या या विधानानंतर स्वामीजी भलतेच ओशाळले. आता या अनाहूत पाहुण्यामुळे स्वामीजीही म्हणू लागलेत बाप रे बाप... डोक्याला ताप...