मुंबईमध्ये होणार सारेगमपचे ऑडिशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 11:26 IST2017-11-13T05:56:53+5:302017-11-13T11:26:53+5:30
झी मराठी वाहिनीवर सुरांचा महायज्ञ पुन्हा सुरू होतोय. जगभरातील मराठी रसिक श्रोत्यांना भुरळ पाडणाऱ्या, संगीत जगतातील लोकप्रिय कार्यक्रम ठरलेल्या ...
(1).jpg)
मुंबईमध्ये होणार सारेगमपचे ऑडिशन
झ मराठी वाहिनीवर सुरांचा महायज्ञ पुन्हा सुरू होतोय. जगभरातील मराठी रसिक श्रोत्यांना भुरळ पाडणाऱ्या, संगीत जगतातील लोकप्रिय कार्यक्रम ठरलेल्या 'सारेगमप'च्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. सुरांची ही मैफिल १३ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
आतापर्यंत औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे या कार्यक्रमाचे ऑडिशन झाले असून या ऑडिशन्सना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता १३ नोव्हेंबरला मुंबईमधील १६ ते ३० या वयोगटातील हरहुन्नरी गायक-गायिकांच्या शोधात प्राथमिक निवड चाचणी भरवण्यात येणार आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत, P3 इन्फोटेक फिल्म स्टुडिओ, मालवणी, मुंबई, महाराष्ट्र - ४०००६५ या ठिकाणी इच्छुक स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे.
ज्यांच्या प्रत्येक सिनेमात संगीत ही एक जमेची बाजू ठरलेली आहे, असे नटरंग, बालगंधर्व, टाईमपास अशा सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव या पर्वात तरुण गायक-गायिकांना पारखणार आहेत. नव्या पर्वात गानहिऱ्यांची अचूक निवड करण्यासाठी आणि तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे परीक्षकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या मराठी संगीत क्षेत्रात तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारा, सारेगमप लिटिल चॅम्प्समधून रसिकांच्या पसंतीस उतरलेला गायक-संगीतकार रोहित राऊत या पर्वात सूत्रसंचालक म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे.
झी मराठी वाहिनीने 'सारेगमप' या रिअॅलिटी शोमधून आजवर मराठी संगीतसृष्टीला अनेक सुरेल गायक-गायिका मिळवून दिले आहेत. मराठी संगीत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यात 'सारेगमप'चा मोलाचा वाटा आहे. नव्याने सुरू होणाऱ्या पर्वात कार्यक्रमाच्या रूपरेषेत काही कल्पक बदल करण्यात आले आहेत.
तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला वाव देण्यासाठी 'घे पंगा, कर दंगा' असे आवाहन करत महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण सहा शहरांमध्ये ऑडिशन्स घेतली जाणार आहेत. प्रत्येक शहरांतून साधारण १० स्पर्धक मुंबईला होणाऱ्या पुढील फेरीसाठी निवडण्यात येतील. पुढे त्यातील २४ उत्तम गायक स्पर्धकांची गाला राउंडसाठी निवड होईल, या फेरीत ज्या स्पर्धकाच्या सुरांचा दंगा अधिक श्रवणीय ठरेल तो किंवा तीच ठरेल 'सारेगमप'च्या या पर्वाचा महाविजेता!
Also Read : रवी जाधव आणि बेला शेंडे सारेगमपमध्ये झळकणार परीक्षकाच्या भूमिकेत