...आणि राहुल सिंहने ‘पीके’सिनेमातील आमीर खान प्रमाणे धारण केले रूप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 03:38 PM2018-06-30T15:38:39+5:302018-06-30T15:40:00+5:30

छोट्या पडद्यावरील ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेची प्रेक्षकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून या वाहिनीवरील ती सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली आहे.

... and Rahul Singh has taken the form of 'PK' cinematographer Aamir Khan! | ...आणि राहुल सिंहने ‘पीके’सिनेमातील आमीर खान प्रमाणे धारण केले रूप !

...आणि राहुल सिंहने ‘पीके’सिनेमातील आमीर खान प्रमाणे धारण केले रूप !

googlenewsNext

सिनेमातला रंजक गोष्टी कॉपी करत त्याच गोष्टी छोट्या पडद्यावर दाखवण्यात येतात.हे आपण अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. असेच काहीसे ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मालिकेतही पाहायला मिळत आहे.कॉमेडी मालिका असल्यामुळे रसिकांनी कमी वेळेत या मालिकेला भरभरून पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे.या मालिकेतील सगळीच पात्र आणि अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.आता मालिकेत एक हटके ट्रॅक पाहायला मिळणार आहे.‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिका आपल्या हटके कथानकामुळे रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेत मनोरजंनाच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्याचाही प्रयत्न असतो. मालिकेच्या सध्याच्या कथानकातून प्रेक्षकांना तंबाखूविरोधी संदेश देण्यात येत असून त्यासाठी राहुल सिंह या अभिनेत्याने
एक अनोखे रूप धारण केले आहे.या विशिष्ट भागासाठी राहुल सिंहने राजकुमार हिरानी यांच्या पीके' या' सिनेमातील आमीर खानचे विवस्त्र लूकचे कॉपी केल्याचे पाहयला मिळत आहे.

या मालिकेत राहुल सिंहने वेळोवेळी विविध भूमिका साकारल्या असल्या, तरी त्याच्यासाठी आणि निर्मात्यांसाठीही पीकेतील हे रूप वठविणे हे नक्कीच आव्हानात्मक होते.रुपेरी पडद्यावर हे विवस्त्र रूप रंगविताना आमीर खानने त्यात कुठेही अश्लीलता येऊ दिली नव्हती.  म्हणून मालिकेसाठी आमिर खान प्रमाणे दिसण्यासाठी राहुल सिंहसाठी मोठे आव्हान होते. आपल्या या नव्या अंदाजविषयी बोलतान राहुल सिंहने सांगितले, “मी पहिल्यापासूनच आमीर खानचा जबरा फॅन असून या सिनेमातील त्याच्या या रूपाबद्दल मला नेहमीच कुतुहल वाटत राहिलं आहे. पण त्याचे हे रूप मलाही रंगविण्याची संधी मिळेल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. छोट्या पडद्यावर पीकेची ही व्यक्तिरेखा रंगविताना मला खूपच मजा आली. ते रूप अचूकपणे उभं करण्यासाठी मला ब-याच टेस्ट द्याव्या लागल्या होत्या. आता या भागाला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, ते पाहण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.”छोट्या पडद्यावरली ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेची प्रेक्षकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून या वाहिनीवरील ती सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली आहे. 

याच मालिकेतील अभिनेता राहुल सिंह प्रमाणेच कन्हैय्याची भूमिका साकारणा-या मणिंदरसिंगने विनोदाचे अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. तो स्वत: उत्कृष्ट अभिनेता तर आहेच, पण त्याला भारतीयांच्या सर्वात आवडत्या खेळाचीही- क्रिकेटची- प्रचंड आवड आहे. इतकेच नव्हे, तर त्याला हा खेळ इतक्या उत्तम प्रकारे खेळता येतो की त्याच्या परिसरात त्याला सचिन म्हणूनच ओळखले जाते.

Web Title: ... and Rahul Singh has taken the form of 'PK' cinematographer Aamir Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.