​थपकी प्यार की या मालिकेतील भूमिकेसाठी शेबान अझीमने घेतली अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 14:23 IST2017-01-28T08:53:22+5:302017-01-28T14:23:22+5:30

शेबान अझीमने आतापर्यंत दिल मिल गये, एक हजारो में मेरी बहना है, सिलसिला प्यार का यांसारख्या मालिकेत काम केले ...

Amitabh Bachchan inspired by Shaban Azim to play Thapki Pyaar Ki | ​थपकी प्यार की या मालिकेतील भूमिकेसाठी शेबान अझीमने घेतली अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रेरणा

​थपकी प्यार की या मालिकेतील भूमिकेसाठी शेबान अझीमने घेतली अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रेरणा

बान अझीमने आतापर्यंत दिल मिल गये, एक हजारो में मेरी बहना है, सिलसिला प्यार का यांसारख्या मालिकेत काम केले आहे. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता थपकी प्यार की या मालिकेत तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
थपकी प्यार की या मालिकेत काही भागांसाठी तो एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. 
शेबान पहिल्यांदाच सूत्रसंचालकाची भूमिका साकारत असल्याने तो सध्या या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. सर्वात चांगला सूत्रधार कोण असे आपल्याला कोणी विचारले तर सगळ्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांचाच चेहरा आपल्या नजरेसमोर येतो. त्यामुळे शेबानदेखील थपकी प्यार की या मालिकेतील भूमिकेची तयारी करण्यासाठी अमिताभ बच्चन यांचीच मदत घेत आहे. या भूमिकेची तयारी करण्यासाठी तो सध्या कौन बनेगा करोडपती या मालिकेचे अनेक भाग अतिशय निरखून पाहात आहे. शेबान या भूमिकेच्या तयारीविषयी सांगतो, "मी मालिकेच्या पुढील भागांमध्ये एका कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सूत्रसंचालन करण्यासाठी अमिताभ यांच्याशिवाय मी कोणत्या अभिनेत्याकडून प्रेरणा घेऊच शकत नव्हतो असे मला वाटते. त्यामुळे सध्या मी माझा जास्तीत जास्त वेळ कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे भाग युट्युबवर पाहण्यात घालवत आहे. त्यांच्या सूत्रसंचालनातील थोड्याशा तरी गोष्टी आत्मसात करून माझी भूमिका मला चांगल्याप्रकारे साकारता आली तर याचा मला प्रचंड आनंद होईल. मी सध्या या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात स्पर्धकाने प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर अमिताभ बच्चन काही सेकंदाचा जो काही सस्पेन्स ठेवायचे तो अप्रतिम असायचा. यामुळे प्रेक्षकांची आणि स्पर्धकांची उत्सुकता शिगेला पोहोचायची. त्यांच्यासोबत कोणत्याही गोष्टींमध्ये मॅच करणे हे खूप कठीण आहे. पण त्यांच्याकडून मी सध्या खूप काही शिकायला प्रयत्न करत आहे."

Web Title: Amitabh Bachchan inspired by Shaban Azim to play Thapki Pyaar Ki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.