सहा तासांच्या अथक मेहनतीनंतर साकारण्यात आलं नरसिंहाचे रुप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:35 PM2019-02-21T17:35:59+5:302019-02-21T17:37:36+5:30

मालिकेत नरसिंहाचं रुप रेखाटण्यासाठी विठुमाऊलीची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊत आणि पडद्यामागील संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतलीय.

After six hours of hard work, Narasimha was transformed! | सहा तासांच्या अथक मेहनतीनंतर साकारण्यात आलं नरसिंहाचे रुप !

सहा तासांच्या अथक मेहनतीनंतर साकारण्यात आलं नरसिंहाचे रुप !

googlenewsNext

‘स्टार प्रवाह’वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेतून प्रेक्षकांना विठुरायाच्या विविध रुपांचं दर्शन घडत असतं. कृष्ण, महादेव, धनगर, वृद्ध अश्या वेगवेगळ्या रुपांमध्ये विठुमाऊलीचं दर्शन घडल्यानंतर आता लवकरच विठुरायाचा नरसिंह अवतार मालिकेत पाहायला मिळणार आहे. कलीयुगातही विठ्ठल नामाचा गजर अखंड सुरु राहावा यासाठी पुंडलिकाने मंदिर बांधण्याचं कार्य हाती घेतलंय. पुंडलिकाच्या या प्रवासात बरीच आव्हानं आहेत. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगातल्या तीन विशेष घटकांपासून पुंडलिकाला विठ्ठलाचं मंदिर उभारायचं आहे. पुंडलिकाला त्याच्या ध्येयपूर्तीचा मार्ग दाखवण्यासाठी विठुरायाने नरसिंह अवतार धारण केलाय. भक्ताला योग्य दिशा दाखवण्यासाठी भगवंत कोणत्या ना कोणत्या रुपात प्रकट होत असतो असा मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेतून करण्यात येतोय.

मालिकेत नरसिंहाचं रुप रेखाटण्यासाठी विठुमाऊलीची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊत आणि पडद्यामागील संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतलीय. सहा तासांच्या अथक मेहनतीनंतर नरसिंह अवतार साकारण्यात आला. नरसिंहाचं हे रुप रेखाटण्यासाठी तीन मेकअप आर्टिस्टची टीम झटत होती.

या भूमिकेविषयी सांगताना अजिंक्य राऊत म्हणाला, ‘जया अंगी मोठे पण तया यातना कठीण या म्हणीचा प्रत्यय मी ही भूमिका साकारताना प्रत्यक्ष अनुभवला. या विशेष भूमिकेसाठी तयार व्हायला मला तब्बल ६ तास लागले. माझ्या संयमाची ही खऱ्या अर्थाने परीक्षा होती. नरसिंह अवताराचं हे विराट रुप साकारणं माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. या मालिकेच्या निमित्ताने ही संधी मिळाल्याचा विशेष आनंद आहे.’ अशी भावना विठ्ठलाची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊतने व्यक्त केली.
 

Web Title: After six hours of hard work, Narasimha was transformed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.