​रिअॅलिटी शो नंतर सलमान खान वळला मालिकेकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 10:02 IST2018-02-24T04:32:29+5:302018-02-24T10:02:29+5:30

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहे. मोठ्या पडद्यावरच नव्हे तर छोट्या ...

After the reality show Salman Khan turns to the series | ​रिअॅलिटी शो नंतर सलमान खान वळला मालिकेकडे

​रिअॅलिटी शो नंतर सलमान खान वळला मालिकेकडे

मान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहे. मोठ्या पडद्यावरच नव्हे तर छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांद्वारे देखील त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. बिग बॉस, दम का दम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्याने आजवर केले आहे. बिग बॉस या कार्यक्रमाचा तर प्रेक्षक त्याच्या शिवाय विचार देखील करू शकत नाही. त्याच्या बिग बॉस या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला. आता दस का दम या कार्यक्रमाद्वारे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
सलमान खानच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. रिअॅलिटी शो नंतर सलमान खान आता मालिकेकडे वळला आहे. सलमान मालिकेकडे वळला म्हणजे तो कोणत्या मालिकेमध्ये काम करणार असे तुम्हाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. सलमान मालिकेच्या निर्मितीक्षेत्रात पदार्पण करणार आहे. सलमान पोलिसांच्या आयुष्यावर आधारित एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणणार असून या मालिकेसाठी सध्या कलाकारांची शोधाशोध सुरू आहे. दबंग, गर्व: प्राईड अॅन्ड ऑनर यांसारख्या चित्रपटांमध्ये सलमानने आजवर पोलिसांची भूमिका साकारली आहे. पोलिसांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करत लोकांच्या संरक्षणाची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांचा हा संघर्ष प्रेक्षकांच्या समोर मांडण्याची गरज असल्याचे सलमानला वाटत आहे. सलमानची ही मालिका डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.
सलमान या मालिकेसोबत आणखी एका मालिकेची निर्मिती करणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. गामा पहिलवान यांच्या आयुष्यावर ही मालिका असून या मालिकेत गामा पहिलवान यांची मुख्य भूमिका सलमानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. 
सोहेलने कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता गामा पहिलवान यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. 

Also Read : कॉमेडी हाय स्कूलमध्ये हजेरी लावण्यासाठी सलमान खानने घेतले इतके करोड रूपये... वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

Web Title: After the reality show Salman Khan turns to the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.