मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीनं केला गुपचूप साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:59 AM2023-11-06T10:59:32+5:302023-11-06T10:59:44+5:30

या अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

After Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate, another actress did a secret wedding, photos surfaced | मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीनं केला गुपचूप साखरपुडा, फोटो आले समोर

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीनं केला गुपचूप साखरपुडा, फोटो आले समोर

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. काही कलाकारांनी आपलं नातं जगजाहीर केलं तर काहींनी साखरपुडा केला. आता लवकरच अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. नुकतेच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी गुपचूप साखरपुडा केला आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा केला आहे. आता तुम्ही म्हणाल, कोण आहे ही अभिनेत्री. तर तुला पाहते रे मालिकेत झळकलेली अभिनेत्री सोनल पवार (Sonal Pawar).

अभिनेत्री सोनल पवार हिने गुपचूप साखरपुडा केला आहे. तिचे सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळत आहेत. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव समीर पालुष्टे आहे. समीर आणि सोनलने एकमेकांना गुडघ्यावर बसुन अंगठी घातली. याशिवाय रोमँटिक अंदाजात दोघांनी साखरपुड्याचं फोटोशूट केले. त्यांच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

सोनलचा होणार नवरा कोण आहे?
समीर पालुष्टे हा बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजिटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणून काम करतो. त्याला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. 

सोनलच्या वर्कफ्रंटबद्दल...
सोनल पवारने तुला पाहते रे मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिने रुपालीची भूमिका केली होती. याशिवाय तिने घाडगे अँड सून या मालिकेतही काम केले आहे. सध्या ती रमा - राघव मालिकेत झळकत आहे. यात तिने अश्विनीची भूमिका बजावली आहे. 
 

Web Title: After Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate, another actress did a secret wedding, photos surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.