'देव 2'च्या सेटवर आशिष चौधरीला मिस करतोय 'या' अभिनेत्रीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 15:54 IST2018-06-15T10:24:19+5:302018-06-15T15:54:19+5:30
कलर्सची लोकप्रिय मालिका देव ने अजून एका लक्षवेधक सीझन सह पुनरागमन केले आहे. या काल्पनिक गुप्तहेरविषयक थरारक मालिकेने देवच्या ...

'देव 2'च्या सेटवर आशिष चौधरीला मिस करतोय 'या' अभिनेत्रीला
क र्सची लोकप्रिय मालिका देव ने अजून एका लक्षवेधक सीझन सह पुनरागमन केले आहे. या काल्पनिक गुप्तहेरविषयक थरारक मालिकेने देवच्या जगात प्रेक्षकांना नेले आहे, जो एक गुप्तहेर असून त्याचे चौकस डोळे गहन रहस्ये सुध्दा सोडवतात. शोच्या दुसऱ्या सीझन मध्ये गुंतागुंतीचे कथानक असून प्रमुख भूमिकेत असणार आहे आशिष चौधरी आणि सोबत मुख्य भूमिकां मध्ये आहेत जिज्ञासा सिंग, पूजा बॅनर्जी, अमित दोलावत. देव 2चे चित्रीकरण सुरू झाले आहे आणि अभिनेता आशिष चौधरी पुन्हा पडद्यावर येण्यासाठी आनंदी झाला आहे पण त्याला एक खंत आहे की त्याला सुमोना चक्रवर्ती सोबत काम करता येणार नाही. आशिष चौधरी म्हणाला, “या सीझन मध्ये बाकीचे कलाकार तेच आहेत, जसे की पूजा बॅनर्जी मेहक म्हणून, अमित दोलावत इन्पेक्टर नार्वेकर म्हणून, जोयश्री अरोरा जोहरा आपा म्हणीन पण यावेळी फक्त सुमोनाच यात नाही. आमचे सर्वांचे सेटवर अतिशय चांगले जमते. आम्हाला सर्वांनाच सेटवर तिची आठवण येते आहे आणि मला आशा आहे की मी पुन्हा तिच्या सोबत लवकरच काम करेन. आमच्या कुटुंबा मध्ये जिज्ञासा सिंग नवीन सदस्य आहे आणि तिचे आमच्या सोबत छान जुळत आहे. ती अतिशय चांगली मुलगी आहे आणि आम्ही सर्व एकत्र छान वेळ घालवतो.”
देव या मालिकेत सुमोना चक्रवर्ती एक मुख्य भूमिका साकारते. शेवटच्या काही दिवसांचे शूटिंग बाकी असताना सुमोना सेटवर चक्कर येऊन पडली होती. मात्र तिचे असणे अतिशय गरजेचे असल्याने या मालिकेच्या टीमने चित्रीकरण काही दिवस पुढे ढकलेले होते.