मृणाल दुसानिसने अमेरिकेत केलं दिवाळीचं पारंपरिक सेलिब्रेशन, पती आणि लेकीसोबतचे गोड फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 03:41 PM2023-11-13T15:41:08+5:302023-11-13T15:46:46+5:30

मृणाल दुसानिस इन्स्टाग्रामवरुन दिवाळीच्या खास सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Actress Mrinal Dusinius celebrated traditional Diwali in america | मृणाल दुसानिसने अमेरिकेत केलं दिवाळीचं पारंपरिक सेलिब्रेशन, पती आणि लेकीसोबतचे गोड फोटो केले शेअर

मृणाल दुसानिसने अमेरिकेत केलं दिवाळीचं पारंपरिक सेलिब्रेशन, पती आणि लेकीसोबतचे गोड फोटो केले शेअर

सध्या सगळीकडेच दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करतात. बॉलिवूडप्रमाणेच मराठी कलाकारांच्या घरीही दिवाळीची धामधूम असते. यंदाही सेलिब्रिटी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करत आहेत. कलाकारांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने मुली आणि नवऱ्यासोबतच दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत. 

मृणाल दुसानिस इन्स्टाग्रामवरुन दिवाळीच्या खास सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यात मृणाल तिचा पती नीरज मोरेसह मुलगी नुर्वीसोबतचा सुंदर फोटो शेअर केलंत. यात मृणालने लेक नुर्वीसोबत ट्विनिंग केलं आहे. शुभ दीपावली असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे.    

 

मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिस मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. गेल्या काही वर्षांपासून ती पती नीरज मोरेसह अमेरिकेत स्थायिक झाली आहे. लग्नानंतर मृणाल अभिनयापासून दूर गेली. 2016 साली तिने नीरजसोबत लग्न केले. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर असून अमेरिकेतच राहतो. त्यामुळे मृणाललाही तिकडेच स्थायिक व्हावे लागले. मृणालने लग्नानंतर काही काळ 'हे मन बावरे' मालिका केली मात्र नंतर ती कायमची अमेरिकेत स्थायिक झाली.  मृणाल दुसानिसने २०२० पर्यंत अभिनय क्षेत्रात काम केले. मृणाल 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत शेवटची दिसली. यातील तिची आणि शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांनाही आवडली. 

Web Title: Actress Mrinal Dusinius celebrated traditional Diwali in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.