‘मुस्कान’ मालिकेत या अभिनेत्री लविना टंडनचा एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 10:03 AM2018-05-08T10:03:08+5:302018-05-08T15:33:08+5:30

लवकरच छोट्या पडद्यावर नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.‘मुस्कान’ मालिकेत खडतर वास्तव, नकार, नंतरचा स्वीकार, धमक्या आणि प्रेम यासारख्या ...

Actress Laveena Tandon enters the 'Smile' series | ‘मुस्कान’ मालिकेत या अभिनेत्री लविना टंडनचा एंट्री!

‘मुस्कान’ मालिकेत या अभिनेत्री लविना टंडनचा एंट्री!

googlenewsNext
करच छोट्या पडद्यावर नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.‘मुस्कान’ मालिकेत खडतर वास्तव, नकार, नंतरचा स्वीकार, धमक्या आणि प्रेम यासारख्या भावनांचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. मुस्कान व तिच्या आईला या सा-या भावना एकत्रितच अनुभवाव्या लागतात, पण यामागे कोणते रहस्य आहे? ‘मुस्कान’ मालिकेची कथा मुस्कानच्या बालपणाचे रहस्य उघड करील.सूत्रांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार, टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली लविना टंडन ही या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती सुझानची भूमिका रंगविणार आहे. या भूमिकेतील लविनाचे रूप इतके भिन्न असेल, की लविनाला प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच अशा रूपात पाहिलेली नाही. मालिकेत आरिना डे ही बंगाली अभिनेत्री मुस्कानची आई आरतीची भूमिका उभी करणार असून सात वर्षांच्या मुस्कानची भूमिका सोनाक्षी सावे साकारणार आहे.लविनाच्या सुझानच्या व्यक्तिरेखेचा तपशील अजून गुलदस्त्यांत असला, तरी तिची भूमिका कशी आकार घेईल, हे पाहणे रंजक ठरेल. ‘रश्मी शर्मा टेलिफिल्म्स’ने या मालिकेची निर्मिती केली असून दिलीपकुमार हे तिचे दिग्दर्शक आहेत. रिचा सोनी, अनामिका तिवारी आणि अभिजित लाहिरी हे सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.

‘मुस्कान’ ही नवी मालिका आई आणि तिची मुलगी यांच्यातील नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवलेल्या या मालिकेचा कथाभाग टीव्हीवरील नेहमीच्या सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा अगदी वेगळा आहे.या मालिकेतील मुस्कानच्या भूमिकेसाठी हर्षाली मल्होत्राची निवड करण्यात आली होती.परंतु त्यामुळे हर्षालीला चित्रपटांतील भूमिका गमवाव्या लागल्या असत्या आणि हर्षालीला चित्रपटातील भूमिकांवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने तिने या मालिकेत भूमिका रंगविण्यास नकार दिला, असे बोलले जाते. त्यामुळे सोनाक्षी सावे या मुलीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.या मालिकेला यापूर्वी ‘तवायफ’ आणि ‘मीना बाजार’ अशी शीर्षके देण्यात आली होती; परंतु आता या मालिकेचे ‘मुस्कान’ असे नामकरण करण्यात आले आहे.“यापूर्वी तवायफ मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी हीना खान, टिना दत्ता, माही विज वगैरे बड्या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा सुरू होती. परंतु आता नेहा मर्दा ही सुंदर अभिनेत्री ही भूमिका साकारील, अशी दाट शक्यता आहे,” असे एका खात्रीलायक सूत्राने सांगितले. 

Web Title: Actress Laveena Tandon enters the 'Smile' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.