पेशवा बाजीराव या मालिकेत आता या अभिनेत्याची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 11:50 IST2016-11-08T13:46:48+5:302016-11-09T11:50:41+5:30
पेशवा बाजीराव या मालिकेत मुकेश खन्ना ब्रम्हेद्र स्वामीची व्यक्तिरेखा साकारणार असल्याची चर्चा होती. पण या मालिकेतील या व्यक्तिरेखेचा लूक ...

पेशवा बाजीराव या मालिकेत आता या अभिनेत्याची एंट्री
प शवा बाजीराव या मालिकेत मुकेश खन्ना ब्रम्हेद्र स्वामीची व्यक्तिरेखा साकारणार असल्याची चर्चा होती. पण या मालिकेतील या व्यक्तिरेखेचा लूक त्यांना न आवडल्यामुळे त्यांनी या मालिकेचा भाग न व्हायचे ठरवले असे म्हटले जात आहे. ब्रम्हेद्र स्वामींची व्यक्तिरेखा खूप महत्तवाची असल्याने एखाद्या चांगल्या कलाकारानेच ती भूमिका साकारावी असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. मुकेश खन्ना यांनी महाभारत या मालिकेत भीष्मपितामह ही भूमिका साकारली असल्याने ब्रम्हेद्र स्वामींच्या भूमिकेसाठी ते योग्य असल्याचे सगळ्यांना वाटत होते. पण त्यांनी मालिकेसाठी नकार दिल्यानंतर आता या भूमिकेसाठी रविंद्र मंकणींचा विचार केला जात आहे. रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मंकणी यांनीदेखील या मालिकेत काम करण्यास होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे.
सुज्योत वाधवा यांची ही मालिका असून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बाजीराव मस्तानी यांच्या आयुष्यावर असलेला बाजीराव-मस्तानी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. या चित्रपटाच्या यशानंतर ही कथा प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मनिष वाधवा, अनुजा साठे, पल्लवी जोशी, रझा मुराद, नवाब शाह, संजय बत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या तगड्या स्टार कास्टमध्ये आता रविंद्र मंकणींचादेखील समावेश झालेला आहे.