'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहराला अटक, पत्नीने दाखल केली होती तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 11:01 AM2021-06-01T11:01:08+5:302021-06-01T11:03:11+5:30

करण मेहरा आणि निशा रावल यांनी सहा वर्षे डेटिंग केल्यानतंर नोव्हेंबर 2012 मध्ये लग्न केले होते.करणने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत नैतिक बनत रसिकांचे तुफान मनोरंजन केले.

Actor Karan Mehra arrested after his wife & actor Nisha Rawal filed a complaint | 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहराला अटक, पत्नीने दाखल केली होती तक्रार

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहराला अटक, पत्नीने दाखल केली होती तक्रार

googlenewsNext

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत  करण मेहराने मालिका विश्वात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. टीव्ही इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय म्हणून त्याची इमेज आहे. मात्र करण मेहराविषयी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पत्नीला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी करण मेहराला अटक केली आहे.करण मेहराने टीव्ही अभिनेत्री निशा रावलसह लग्न केले आहे. निशा आणि करण टीव्ही इंडस्ट्रीतील  सर्वात क्यूट कपल मानले जाते.

 

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. हा वाद इतका निकोपाला गेला की, निशाने करण विरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करताच करण मेहाराल अटक करण्यात आली.एबीपी माझाच्या वृत्तानुसार घरगुती हिसांचार प्रकरणी करणला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


गेल्या काही दिवसांपासून या कपलचे वैवाहिक आयुष्यात सुरळीत नसल्याच्या बातम्या येत होत्या. यावरच करणने काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरणही दिले होते. त्याने म्हटले होते की, गेल्या काही दिवसांपासून निशा आणि माझ्या नात्यावर प्रश्न निर्माण केले जात आहे. आमच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या उलट सुलट चर्चा रंगत आहेत. या सगळ्या बातम्यांमुळे मी खूप अस्वस्थ झालोय. मीडियात आमच्याविषयी समोर येणा-या चर्चा अफवा आहेत. आम्ही दोघेही एकत्रच राहत आहोत. आमच्यात कोणताही वाद झालेली नाहीय. माझी तब्येत बरी नसून सध्या पत्नी निशाच माझी पूर्ण काळजी घेत असल्याचे त्याने म्हटले होते.


करण आणि निशा यांनी सहा वर्षे डेटिंग केल्यानतंर नोव्हेंबर 2012 मध्ये लग्न केले होते.करणने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत नैतिक बनत रसिकांचे तुफान मनोरंजन केले.ही मालिका सोडल्यानंतर करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकला. तर निशाही टीव्ही अभिनेत्री आहे. निशाने 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' , 'आने वाला पल' , 'केसर' या मालिकांमध्ये झळकली होती.तर करण आणि निशा रिअॅलिटी शो 'नच बलिए' मध्ये एकत्र झळकले होते. या कपलाला एक मुलगा असून त्याचे नाव कविश असे आहे. 

Web Title: Actor Karan Mehra arrested after his wife & actor Nisha Rawal filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.