'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना दिसणार एका नव्या प्रोजेक्टमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:36 PM2022-03-15T12:36:04+5:302022-03-15T12:36:26+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती आणि संजना यांच्या नव्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Aai kuthe Kay Karte Fame Arundhati and Sanjana will be seen in a new project | 'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना दिसणार एका नव्या प्रोजेक्टमध्ये

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना दिसणार एका नव्या प्रोजेक्टमध्ये

googlenewsNext

'आई कुठे काय करते'  (Aai Kuthe Kay Karate)  ही मालिका टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अरुंधती आणि आशुतोषचे लग्न होऊन ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. मात्र आता नवीन माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरुंधती-संजना या मालिकेनंतर पुन्हा एकदा एका नव्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहेत.

मराठी सिरियल्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या पोस्टनुसार, अरुंधती-संजना अर्थातच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर एका नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र झळकणार आहेत. त्या दोघी लवकरच एका नव्या नाटकात पाहायला मिळणार आहे. अद्याप या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. 

'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत नुकतेच अरुंधती भाड्याने स्वतःच्या घरात राहायला गेली आहे. तसेच आशुतोषनेदेखील अरुंधतीसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच लवकरच आशुतोष आणि अरुंधतीचा नवा अल्बम मोठ्या दिमाखात भेटीला येणार आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबातील काही लोक खूप खूश आहेत तर अनिरुद्ध आणि संजनाचा जळफळाट होताना दिसणार आहे. अरुंधतीचा पहिला अल्बम भेटीला आल्यानंतर मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Aai kuthe Kay Karte Fame Arundhati and Sanjana will be seen in a new project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.