आई कुठे काय करते : अखेर मालिकेत परतली अरूंधती, सगळयांच्या जीवात आला जीव...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:14 AM2022-01-26T11:14:55+5:302022-01-26T11:15:45+5:30

Aai Kuthe Kay Karate : ‘आई कुठे काय करते’मधून गायब असणारी अरूंधती एवढ्या दिवस कुठे होती आणि काय करत होती?

aai kuthe kay karate latest arundhati aka madhurani prabhulkar is back in show | आई कुठे काय करते : अखेर मालिकेत परतली अरूंधती, सगळयांच्या जीवात आला जीव...!!

आई कुठे काय करते : अखेर मालिकेत परतली अरूंधती, सगळयांच्या जीवात आला जीव...!!

googlenewsNext

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate ) या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेतील अरूंधती अर्थात ही भूमिका साकारणारी मधुराणी गोखले-प्रभुलकर (Madhurani gokhale-prabhulkar) गेल्या काही दिवसांपासून मालिकेतून गायब होती. ती मालिकेत दिसत नसल्याने चाहत्यांची घालमेल वाढली होती. पण आता अरूंधती पुन्हा एकदा मालिकेत परतली आहे. 

होय, तब्येतीच्या कारणामुळे मधुराणीने मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. मात्र आता तब्येत सुधारली असून तिची मालिकेत रि-एन्ट्री झाली आहे. साहजिकच अरूंधती परतल्याने प्रेक्षकांच्या जीवात जीव आला आहे.
अरूंधती परतल्याने देशमुख कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे. अरूंधती ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची आत्मा आहे. अख्खी मालिका तिच्याभोवती गुंफली आहे. अशात  अभि आणि अनघाच्या लग्नानंतर मालिकेतून अरूंधती अचानक गायब झाली होती. साहजिकच प्रेक्षकांच्या मनात विविध प्रश्नांचे काहूर माजले होते. 

कथानकानुसार,अरुंधती तिच्या आईसोबत देवदर्शनाला गेली होती. अशातच तिच्या बसचा अपघात होतो. मात्र ती आणि तिची आई सुखरुप आहे, असं मालिकेतून स्पष्ट झालं आहे आणि आता अरुंधती समृद्धी निवासमध्ये सुखरूप पोहचली आहे. तिला सुखरूप पाहून आई-आप्पा, यश, अनघा, गौरी सर्वांनाच आनंद झाला आहे. गायब असलेली अरुंधती कुठे होती आणि काय करत होती याचे उत्तर आता सर्वांना मिळाले आहे.

दरम्यान अरुंधती जरी देशमुख कुटुंबात, तिच्या माणसात परतली असली तरी ती आता जास्त काळ या घरात राहणार नसल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून समोर आलं आहे. कारण ती अभि आणि अनघाच्या लग्नापर्यंत या घरात राहणार होती. त्यामुळे पुन्हा ती समृद्धी निवास सोडणार की सगळ्यांच्या प्रेमाखातर ती परत याच घरात राहणार, हा प्रश्न आहेच़  देशमुखांच्या  घरातून बाहेर पडून ती नवीन आयुष्य सुरू करणार का? हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे.

मधुराणी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. 

Web Title: aai kuthe kay karate latest arundhati aka madhurani prabhulkar is back in show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.