'संध्या बींदणी' च्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण, नव-यासोबत 'या' ठिकाणी केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 15:41 IST2018-05-04T09:36:46+5:302018-05-04T15:41:25+5:30

कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणा-या ...

4th anniversary of 'Sandhya Beindani' marriage, Celebration done with 'Navs' in Navsa | 'संध्या बींदणी' च्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण, नव-यासोबत 'या' ठिकाणी केले सेलिब्रेशन

'संध्या बींदणी' च्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण, नव-यासोबत 'या' ठिकाणी केले सेलिब्रेशन

ाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.अशीच हिंदी टेलिव्हीजनवरील एक जोडी म्हणजे दीपिका सिंह आणि रोहित राज.या दोघांनी नुकताच त्याच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला.दीपिकाने गोव्यात सेलिब्रेशन करतानाचे काही फोटो तिच्या इन्स्ट्राग्रावर अकाऊंटवर शेअर केले आहेत.



 दीपिकाने 2 मे, 2014 ला डायरेक्टर रोहित राज गोयलसोबत लग्न केले होते.पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता. दीपिका ही अभिनेत्री आहे तर रोहित राज हा दिग्दर्शक आहे. 'दिया और बाती हम' शोमधूनच दीपिकाने अभिनयाला सुरुवात केली होती.आणि याच मालिकेचा रोहित दिग्दर्शकही होता.एकत्र काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.पुढे या दोघांनी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.दोघेही 'नच बलिए-6' पर्वातही झळकले होते.

आता लग्नानंतर दीपिका-रोहितला एक मुलगा आहे.मुलाचे नाव तिने सोहम ठेवले असून सोहम रोहित गोयल या नावाने तो ओळखला जाणार असे दिपिकाने सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले होते.सध्या बाळाची नीट काळजी घेता यावी म्हणून तिने  करिअरला ब्रेक देत लग्नानंतर आता पूर्णपणे घर आणि मुलाकडे लक्ष देत आहे.दीपिकाला सध्या अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत असल्यातरी आता तिला मालिकांमध्ये रस नाही तर बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची तिची इच्छा असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले होते.बाळाच्या जन्मानंतर ती वर्कआऊट, डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय.ती नेहमी तिने इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडिओ शेअर करत असते.यामध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करताना दिसते. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्लिम ट्रीम बॉडी कमावण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे.


'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच 'दिया और बाती हम' या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं.त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिया और बाती या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला होता.मालिका बंद होवून वर्ष होवूनही रसिक संध्या बिंदनीला मात्र विसरलेले नाहीत.त्यामुळे दीपिकाला सतत ती पुन्हा छोट्या पडद्यावर कधी झळकणार असे प्रश्न विचारण्यात येत होते.यावर दीपिकानेही योग्य संधी मिळताच पुन्हा तुमच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले होते.

Web Title: 4th anniversary of 'Sandhya Beindani' marriage, Celebration done with 'Navs' in Navsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.