बाप्पाच्या मिरवणुकीत तेजस्विनीची शूटिंग
By Admin | Updated: September 5, 2016 02:23 IST2016-09-05T02:23:32+5:302016-09-05T02:23:32+5:30
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल खरंतर ढोल-ताशांच्या गजरानेच आपल्याला लागते.

बाप्पाच्या मिरवणुकीत तेजस्विनीची शूटिंग
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल खरंतर ढोल-ताशांच्या गजरानेच आपल्याला लागते. १० दिवसांच्या या मंगलमय उत्साहात सर्व जणच आनंदाने सहभागी झालेले असतात. गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे, बाप्पाच्या विसर्जण मिरवणुकीतील धमाल मस्ती. पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठमोठाल्या विसर्जन मिरवणुका या वेळी आपल्याला दिसतात. जगभरातून हा जल्लोष पाहण्यासाठी लोक बाप्पाच्या मिरवणुकांमध्ये सामील होतात. अनेक चित्रपटांमध्येदेखील आपण गणेशाची मिरवणूक पाहिली आहे. सिनेसृष्टीला आणि कलाकारांनादेखील या मिरवणुकांची भूरळ पडलेली असून, आपल्याला अनेक कलाकार ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकांमध्ये थिरकताना दिसतात. आता असेच काही करणार आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित. आता तुम्ही म्हणाल की, तेजस्विनी बाप्पाच्या मिरवणुकीत नक्की काय करणार आहे? तर ही पठ्ठी या वेळी एका चित्रपटाचे शूटिंग गणेश विसर्जन मिरवणुकीत करणार आहे. याबाबत तेजस्विनी ‘सीएनएक्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगते, मला गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवायला फार आवडते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मी ढोल वाजवत आहे. परंतु, या वेळी मला वादन करायला मिळणार नाही. कारण, गणेश विसर्जन मिरवणुकीत मी एका आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. मात्र यातून मला वेळ मिळालाच तर मी नक्कीच ढोल वाजवण्याची मजा लुटणार आहे. लाइव्ह मिरवणुकीत केलेल्या चित्रीकरणामध्ये वेगळीच मजा असते. प्रेक्षकांना पडद्यावर ते सीन्स पाहतानाही भव्यदिव्य वाटतात.चला तर मग तयार राहा तेजस्विनीच्या चित्रपटातील बाप्पाच्या मिरवणुकीला चित्रपटात पाहण्यासाठी.