विद्या बडोद्यात पिणार चहा
By Admin | Updated: June 19, 2014 10:50 IST2014-06-19T10:46:27+5:302014-06-19T10:50:00+5:30
विद्या बालन सध्या तिच्या ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. लवकरच ती बडोदा येथे जाणार आहे.

विद्या बडोद्यात पिणार चहा
>विद्या बालन सध्या तिच्या ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. लवकरच ती बडोदा येथे जाणार आहे. विद्या बडोद्याला जाण्यामागे एक खास कारण आहे. बडोद्यात श्री नावाचे एक प्रसिद्ध टी स्टॉल आहे. या स्टॉलचा मालक निवडणुकीच्या वेळी मोदींच्या नावावर मोफत चहा देत असे. तेथेच जाऊन चहा पिण्याची विद्याची योजना आहे. हे टी स्टॉल निवडणुकीदरम्यान सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. विद्या ‘बॉबी जासूस’मध्ये एका हेराची भूमिका निभावत आहे. तिने नुकतेच म्हटले होते की, तिला नरेंद्र मोदींची हेरगिरी करण्याची इच्छा आहे. मोदींच्या दिनचर्येबाबत जाणून घेण्याची उत्सुकता तिला आहे. त्यामुळे आता गुजरातेतील चहा पिण्याची संधी तिला गमवायची नाही. तिच्या मते, तेथील चहामध्ये नक्कीच काही तरी खास असेल.