सनी ‘डॉन’च्या भूमिकेत
By Admin | Updated: July 29, 2015 03:58 IST2015-07-29T03:58:36+5:302015-07-29T03:58:36+5:30
‘मो हल्ला अस्सी’ हा सनी देओलचा चित्रपट अश्लील संवादांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे या चित्रपटाचे भविष्य अर्धवट राहिले. नोव्हेंबरमध्ये सनी देओलचा होम प्रॉडक्शन चित्रपट

सनी ‘डॉन’च्या भूमिकेत
‘मो हल्ला अस्सी’ हा सनी देओलचा चित्रपट अश्लील संवादांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे या चित्रपटाचे भविष्य अर्धवट राहिले. नोव्हेंबरमध्ये सनी देओलचा होम प्रॉडक्शन चित्रपट ‘घायल रिटर्न’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यादरम्यान त्याच्या एका चित्रपटाविषयी खूप चर्चा सुरू आहे. नीरज पाठक यांच्या दिग्दर्शनाखालील ‘भैया जी’ चित्रपटाची शूटिंग जवळपास पूर्ण होत आली आहे. हा चित्रपट निर्मात्यांमधील वादामुळे अडकला होता; पण आता सर्व वाद मिटले असून, चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप फिक्स नाही; पण सूत्रांच्या माहितीनुसार, या वर्षीच चित्रपट रिलीज होणार आहे. यात सनी देओल डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रथमच सनी देओल डॉनची भूमिका करीत आहे. प्रीती झिंटा सनीची हीरोईन आहे. त्याशिवाय अरशद वारसी, श्रेयस तळपदे, आशुतोष राणा, संजय मिश्रा, मनोज जोशी हे सहायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.