सनी मराठी चित्रपटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 00:06 IST2017-05-07T00:06:00+5:302017-05-07T00:06:00+5:30
बॉलिवूडमध्ये आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी लवकरच ‘बॉईझ’ या चित्रपटात दिसणार आहे

सनी मराठी चित्रपटात
बॉलिवूडमध्ये आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी लवकरच ‘बॉईझ’ या चित्रपटात दिसणार आहे. या मराठी चित्रपटात ती आयटम साँग सादर करणार आहे. या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता अवधूत गुप्ते आहे. त्याबाबत तो सांगतो, ‘आम्हाला या सिनेमाद्वारे मराठीत कधीच झाले नाही, असे काही तरी करून दाखवायचे होते. त्यामुळे हिंदीच्या सुप्रसिद्ध चेहऱ्याचा यात उपयोग करून घ्यायचे आम्ही ठरवले. निर्माते राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने सनी लिओनी आमच्या सिनेमात सामील झाली. ती आमच्या सिनेमाचा एक भाग झाली ही केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर आमच्या संपूर्ण टीमसाठी खूप आनंदाची बाब आहे.’ सनीचे हे आयटम साँग गणेश आचार्य कॉरिओग्राफ करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर करणार आहे. हा चित्रपट तरुणांच्या भावविश्वावर आधारित आहे. सुनिधी चौहानने गायलेल्या या आयटम साँगचे संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्तेचे आहे.