सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 00:26 IST2017-05-13T00:26:33+5:302017-05-13T00:26:33+5:30

सध्या चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या नाही, तर मराठमोळ्या अंदाजाच्या चर्चा रंगल्या आहेत. नेहमीच या बेबी डॉल सनीच्या सेक्सी अदा

Sunny Leone's Maratha Style | सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज

सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज

सध्या चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या नाही, तर मराठमोळ्या अंदाजाच्या चर्चा रंगल्या आहेत. नेहमीच या बेबी डॉल सनीच्या सेक्सी अदा आणि नखऱ्यांवर सारेच फिदा होतात. तिचा बोल्ड लुक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो. ‘आॅन एंड आॅफ स्क्रीन’ बोल्ड लुकमुळे चर्चेत असणारी सनी आता मराठी सिनेमात आपल्या अभिनयासह सौंदर्याची जादू पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. सनी लिओनी ‘बॉईज’ या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून ती चक्क मराठी आयटम साँग करताना रुपेरी पडद्यावर थिरकणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला तिने सुरुवात केली असून मराठमोळ्या लुकमध्ये सनीचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सनी लिओनीचा हा मराठमोळा अंदाज साऱ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर खुद्द सनीने लिओनीनेच तिचा मराठमोळ्या अंदाजातला फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रियाही मिळत आहेत. त्यामुळे आता बेबी डॉल सनी लिओनीचा हा मराठमोळा अंदाज रुपेरी पडद्यावर काय कमाल करतो, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. ‘बॉईज’ हा सिनेमा तरुण पिढीवर आधारित असल्याचे समजते. या आयटम साँगचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले असून सनीदेखील त्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसून आले. सुनिधी चौहानने गायलेल्या या आयटम गाण्याचे संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्तेने केले असून हिंदीचे प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्यावर सनीला थिरकवले आहे.

Web Title: Sunny Leone's Maratha Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.