सनी लिऑन म्हणते, ‘ती’ मी नव्हेच!
By Admin | Updated: October 26, 2015 16:49 IST2015-10-26T16:49:45+5:302015-10-26T16:49:45+5:30
‘स्टोरीची डिमान्ड असेल, तर फेक ऑरगॅझम दाखवीन मी पडद्यावर. लिपलॉकचा सीन देईन. पण मला गरज वाटली नाही, तर साध्या टॉपलेसलासुद्धा नकार देईन मी. दिला आहे.’

सनी लिऑन म्हणते, ‘ती’ मी नव्हेच!
>‘तुम्ही जे पाहता ते माझं पडद्यावरचं रूप आहे फक्त’- सनी लिऑन सांगते.
‘मी स्वत:च क्रिएट केलीय ती दुसरी सनी. माझं शरीर फक्त देते तिला मी उसनं.
ती माझ्यापेक्षा इतकी वेगळी दिसते, वागते, असते की;
कधीकधी मलाही ओळखू नाही येत.
बट नाऊ आय कान्ट गेट अवे फ्रॉम हर. आय डोन्ट वॉन्ट टू.
लोकांना एन्टरटेन करणं हा माझा बिझिनेस आहे.
पडद्यावरची सनी तेच तर करते.’
- पण मग लोकांना एन्टरटेन करणं याची व्याख्या काय? आणि मर्यादा?
‘अर्थात!! माझ्या मर्यादा मी ठरवणार. जरूर पडली, तर त्या बदलणार.
हे माझं शरीर आहे. ते पडद्यावर कसं वापरलं जावं हे मी ठरवणार.
आजवर मी या निर्णयाची सगळी सूत्रं कायम माझ्या एकटीच्याच हातात ठेवली आहेत.’- सनी सांगते.
‘स्टोरीची डिमान्ड असेल, तर फेक ऑरगॅझम दाखवीन मी पडद्यावर. लिपलॉकचा सीन देईन. पण मला गरज वाटली नाही, तर साध्या टॉपलेसलासुद्धा नकार देईन मी. दिला आहे.’
भारतातल्या सोवळ्या-ओवळ्याने अनेकदा सनीची गचांडी धरली आहे.
ती म्हणते, माझी पोस्टर्स फाडणा-या, फोटो जाळणा-या लोकांना मला एकच सांगावसं वाटतं, इट्स जस्ट अ मुव्ही यार.चिल.
वॉच इट, एन्जॉय इट अॅन्ड रिलॅक्स!
सनी लिऑनची सविस्तर मुलाखत प्रसिद्ध होत आहे लोकमत दीपोत्सवच्या दिवाळी अंकात...
आपली अंकाची मागणी आत्ताच नोंदवा...