सनी करणार शास्त्रीय नृत्य!
By Admin | Updated: January 16, 2015 00:12 IST2015-01-16T00:12:02+5:302015-01-16T00:12:02+5:30
मदमस्त अभिनय करत बेबी डॉल फेम सनी लिआॅन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. पण तिच्या चित्रपटाच्या गाण्यातही अंगप्रदर्शनाव्यतिरिक्त काही करण्याची तिला संधीच मिळाली.

सनी करणार शास्त्रीय नृत्य!
मदमस्त अभिनय करत बेबी डॉल फेम सनी लिआॅन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. पण तिच्या चित्रपटाच्या गाण्यातही अंगप्रदर्शनाव्यतिरिक्त काही करण्याची तिला संधीच मिळाली. नव्हती. पण नृत्यकौशल्य दाखवण्याची संधी तिला मिळाली आहे. एका चित्रपटात सनीला चक्क शास्त्रीय नृत्य करायचं आहे. त्यासाठी सनीला योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी कोरिओग्राफर सरोज खान यांनाच शिकवण्यास सांगण्यात आलंय. या सिनेमाचा दिग्दर्शक अहमद खान यांनी सरोजना सनीला शास्त्रीय नृत्याच्या काही बेसिक स्टेप्स शिकवाव्यात अशी विनंती केली आहे. या अवतारात प्रेक्षक सनीला कसे स्वीकारतील हा प्रश्नच आहे.