सुनील शेट्टीने कधी केली नाही आॅनलाइन शॉपिंग
By Admin | Updated: November 12, 2016 05:27 IST2016-11-12T05:27:08+5:302016-11-12T05:27:08+5:30
सामान्य लोकांप्रमाणे सगळे सेलिब्रेटीदेखील आॅनलाइन शॉपिंग करत असतील असे तुम्हाला वाटत असेल. पण याला काही सेलिब्रेटी अपवाद आहेत

सुनील शेट्टीने कधी केली नाही आॅनलाइन शॉपिंग
सामान्य लोकांप्रमाणे सगळे सेलिब्रेटीदेखील आॅनलाइन शॉपिंग करत असतील असे तुम्हाला वाटत असेल. पण याला काही सेलिब्रेटी अपवाद आहेत. मी कधीच आॅनलाइन शॉपिंग केले नाही असे सुनील शेट्टी सांगतो. लोक आॅनलाइन खरेदी कसे करतात हा त्याला नेहमीच प्रश्न पडतो अशी कबुलीदेखील तो देतो. सुनील सांगतो, ‘आज अनेक आॅनलाइन शॉपिंग साइटवर लोक कपड्यांपासून, चप्पलपर्यंत सगळ्याच गोष्टींची खरेदी करताना दिसतात. पण आॅनलाईन खरेदी करण्याचा मी कधी विचारदेखील करू शकत नाही. कपडे घेताना त्या कपड्याला जोपर्यंत मी हात लावून पाहात नाही, तोपर्यंत मी कपडे घेतच नाही. माझी ही अनेक वर्षांपासूनची सवय आहे. मी स्वत:ची शॉपिंग स्वत: करतो. तसेच कपडे बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरले गेले आहे हे माझ़्यासाठी अधिक महत्त्वाचे असते.