पंजाबी गेटअपने कोणाला दिले यश, कोणाला अपयश
By Admin | Updated: October 9, 2015 02:59 IST2015-10-09T02:59:12+5:302015-10-09T02:59:12+5:30
या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिंग इज ब्लिंग चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर पहिल्या तीन दिवसांतच ५४ कोटींची कमाई सिंगच्या अवतारात परतलेल्या अक्षय कुमारसाठी पुन्हा

पंजाबी गेटअपने कोणाला दिले यश, कोणाला अपयश
या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिंग इज ब्लिंग चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर पहिल्या तीन दिवसांतच ५४ कोटींची कमाई सिंगच्या अवतारात परतलेल्या अक्षय कुमारसाठी पुन्हा एकदा लकी ठरली आहे. यापूर्वी ‘सिंग इज किंग’ला देखील बॉक्स आॅफिसवर चांगले यश मिळाले होते. त्यामध्ये अक्षय कुमारने प्रथमच शीख युवकाची भूमिका केली होती. हे सांगण्याची गरज नाही की, अक्षयसाठी सिंग बनने दोन्ही वेळेस लकी ठरले आहे.
चित्रपटांचा इतिहास पाहिला तर पंजाबी भूमिका अनेक मोठ्या कलाकारांनी केल्या आहेत, परंतु यात कोणाला यश मिळाले तर कोणाची भूमिका फारशी पसंतीस पडली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यात अमिताभ बच्चन आणि सलमान खानसारखे मोठे स्टार आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी सिंगच्या रूपात जास्त पसंत केले नाही.
अमिताभ बच्चनने प्रथम मेजर साब आणि नंतर अनिल शर्मा यांचा ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’मध्ये अशी भूमिका केली होती, मात्र दोन्ही चित्रपट अयशस्वी ठरले. दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या यशासोबत सर्वात मोठे नाव ‘गदर’ो जोडले आहे, ज्यामध्ये सनी देओलच्या शीख गेटअपने या चित्रपटाच्या यशात मोठे योगदान दिले. पंजाबचे पुत्तर धर्मेंद्रच्या या पुत्रावर सरदारचा गेटअप जास्त शोभतो. ‘गदर’शिवाय जे.पी. दत्ता यांचा ‘बॉर्डर’ आणि ‘यमला पगला दीवाना’मध्ये सनी सरदार बनला आहे. मात्र सनीला काही चित्रपटांत अपयशालाही तोंड द्यावे लागले. ‘जो बोले सो निहाल’ आणि ‘गुरू ग्रंथ साहब’मध्ये सनी देओलचे हे गेटअप फार चालले नाही. पंजाबी भूमिकेत यश न मिळालेल्या कलाकारांमध्ये सलमानसुद्धा आहे. त्याने ‘हीरोज’मध्ये पगडी घातली होती, मात्र त्याच्या चेहऱ्यावर ती शोभली नाही. अशाच प्रकारे रणबीर कपूरनेही ‘राकेट सिंग’मध्ये अशी भूमिका केली होती, तिला पसंत केले गेले. मात्र चित्रपट अपेक्षाप्रमाणे जास्त चालला नाही. अयशस्वी कलाकारांमध्ये संजय दत्त (सरहद पार)चे देखील नाव आहे. सैफ अली खानला ‘लव आज कल’मध्ये मोठी पसंती मिळाली आणि चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट झाला.
अशाच प्रकारे अजय देवगनने प्रथम राजकुमार संतोषी यांचा ‘भगत सिंग’ आणि नंतर आपल्या कंपनीमध्ये ‘सन आॅफ सरदार’ची निर्मिती केली. दोन्ही चित्रपटांत त्यांनी सरदारच्या गेटअपमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले. नुकतेच इरफान खानला शीख पित्याच्या भूमिकेत ‘किस्सा’मध्ये पसंत केले गेले. काही असेही स्टार आहेत, ज्यांना अद्याप सरदारजीची भूमिका मिळालेली नाही. आमीर खान, शाहरूख खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम आजपर्यंत कोणत्याच चित्रपटात अशा गेटअपमध्ये दिसले नाहीत.
- anuj.alankar@lokmat.com