सुबोध पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत
By Admin | Updated: May 7, 2017 00:04 IST2017-05-07T00:04:36+5:302017-05-07T00:04:36+5:30
सुबोध भावे हा एक प्रतिभाशाली कलावंत असण्यासोबतच एक चांगला दिग्दर्शकदेखील आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या

सुबोध पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत
सुबोध भावे हा एक प्रतिभाशाली कलावंत असण्यासोबतच एक चांगला दिग्दर्शकदेखील आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाद्वारे त्याने हे सिद्ध केले आहे. तो सध्या त्याच्या दुसऱ्या चित्रपटावर काम करत असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे घोषित केले आहे. त्याने टिवटर या सोशल नेटवर्किंग साइटला एक पोस्टर टाकली असून त्यावर पुष्पक विमान असे चित्रपटाचे नाव लिहिले आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावे आणि वैभव चिंचाळकर करणार असल्याचे म्हटले आहे. सुबोधने या चित्रपटाची घोषणा दादासाहेब फाळके यांच्या जयंतीच्या निमित्ताने केली आहे. या चित्रपटाची कथा काय असणार, तसेच या चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार, या चित्रपटात सुबोध काम करणार की नाही, याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. आता सुबोध या चित्रपटाबाबत पुढील घोषणा कधी करतो, याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागलेली आहे. सुबोधसोबत या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकर करणार आहे. वैभवने सुबोधची प्रमुख भूमिका असलेल्या एका मालिकेचे दिग्दर्शन केले होते, तर दुनियादारी या चित्रपटाचे त्याने संवाद लिहिले आहेत.