‘अभेद्य’चे दमदार पदार्पण
By Admin | Updated: February 2, 2015 00:32 IST2015-02-02T00:32:10+5:302015-02-02T00:32:10+5:30
मराठीतील आघाडीचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अवधूत गुप्ते यांचा मुलगा अभेद्य गुप्ते ‘एक तारा’ या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे

‘अभेद्य’चे दमदार पदार्पण
मराठीतील आघाडीचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अवधूत गुप्ते यांचा मुलगा अभेद्य गुप्ते ‘एक तारा’ या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. रईस लष्करीया यांची संगीतमय कलाकृती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केले असून, कथा स्वत: अवधूत गुप्ते यांनी सचिन दरेकर यांच्या साथीने लिहिली आहे. अभेद्य गुप्तेने या सिनेमात ओमकार ज्ञानेश्वर लोखंडे नावाच्या एका लहान मुलाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यापूर्वी कधीही कॅमेरा फेस न करणारा अभेद्य या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच कॅमेऱ्यासमोर आला आहे.