स्टार किड्सची पालकांशिवाय एन्ट्री

By Admin | Updated: August 31, 2015 11:50 IST2015-08-30T23:47:47+5:302015-08-31T11:50:19+5:30

संजय दत्त, सनी देओल, आमीर खान आणि हृतिक रोशन यांच्यात साम्य काय आहे, असे विचाराल तर उत्तर एकच असेल की या सर्व स्टार्सला पडद्यावर आणण्यासाठी त्यांचे पालक वा कुटुंबीयांनी विशेष कष्ट घेतले

Star Kids' Parents Without Entry | स्टार किड्सची पालकांशिवाय एन्ट्री

स्टार किड्सची पालकांशिवाय एन्ट्री

संजय दत्त, सनी देओल, आमीर खान आणि हृतिक रोशन यांच्यात साम्य काय आहे, असे विचाराल तर उत्तर एकच असेल की या सर्व स्टार्सला पडद्यावर आणण्यासाठी त्यांचे पालक वा कुटुंबीयांनी विशेष कष्ट घेतले. परंतु आजचे काही फेमस स्टार्स असे आहेत ज्यांचे पालक नावाजलेले कलावंत असूनही ते दुसऱ्याच्या आधाराने रुपेरी पडद्यावर अवतरले. या वर्षी सूरज पांचोली आणि आतिथ्या शेट्टी यांना सलमान खानने प्रमोट केले आहे. आदित्य पांचोली आणि सुनील शेट्टी यांची ही मुले आहेत. आदित्य आणि सुनील गेल्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये आहेत. मुलांना प्रमोट करण्यासाठी या दोघांकडे सारे काही आहे. सुनील शेट्टी आपल्या मुलीचे धडाक्यात लाँचिंग करू शकला असता, मात्र त्याने योग्य संधीची वाट पाहिली. चित्रपट क्षेत्रात गाजलेले परंतु इतर चित्रपट निर्मात्यांमुळे पुढे आलेल्या अशाच काही तारे-तारकांची ही माहिती. २ें्र१.्रल्लेंंि१@’ङ्म‘ें३.ूङ्मे

सलमान खान : सलीम खान हे यशस्वी चित्रपट कथालेखक आहेत. त्यांना मुलगा सलमान खानला लाँच करणे सहज शक्य होते. परंतु त्यांनी सलमानला स्वत: संधी शोधण्यास सांगितले. बिवी हो तो ऐसी चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केल्यानंतर राजश्री प्रॉडक्शनच्या मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानने पदार्पण केले. आज तोच आपल्या प्रॉडक्शन हाऊसकडून विविध कलाकारांना संधी देत आहे.

करिना कपूर : पाठीशी आर. के. बॅनर असल्याने करिना कपूरची चित्रपटातील एंट्री धमाकेदार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या एका दिग्दर्शकाने घेऊन तिला चित्रपट केला. पण, तो पूर्ण झालाच नाही. अखेर ती यातून बाहेर पडली आणि जे. पी. दत्ता यांच्या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत तिने इंडस्ट्रीत एंट्री केली.

वरुण धवन : ४० चित्रपटांच्या निर्मितीची पार्श्वभूमी असताना डेव्हिड धवन आपल्या मुलाला लाँच करील, असे वाटणे अतिशय स्वाभाविक होते. मात्र तसे घडायचे नव्हते. वरुण धवनमधील स्पार्क पाहून करण जोहरने स्टुडंट्स आॅफ द ईअर चित्रपटात संधी दिली. या चित्रपटाचा पुरेपूर वापर वरुणने केला. डेव्हिड धवन यांच्यासोबत तो आता ‘मै तेरा हिरो’ हा चित्रपट करतो आहे.

अभिषेक बच्चन : अमिताभ बच्चन यांची एबीसीएल ही कंपनी अभिषेकला लाँच करील, असे बोलले जात होते. मात्र तसे काही घडले नाही. दिग्दर्शक आणि निर्माते जे. पी. दत्ता यांनी अभिषेकला घेऊन रिफ्युजी चित्रपट केला. मोठा चित्रपट असूनही हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला नाही.

रणबीर कपूर : करिनाप्रमाणेच आर. के. प्रॉडक्शन्स रणबीरला लाँच करील, अशी अपेक्षा होती; मात्र ते घडू शकले नाही. संजय लीला भन्साळी यांनी रणबीरला लाँच करण्याचे ठरविले. अगदी भव्य लाँचिंग करीत साँवरिया रिलीज झाला. ‘ओम शांती ओम’ त्याचवेळी रिलीज झाल्याने हा चित्रपट फारसा प्रभाव पाडू शकला नाही.

टायगर श्रॉफ : ग्रहण आणि बूमसारखे चित्रपट टायगरच्या पालकाने म्हणजे जॅकी श्रॉफ याने तयार केले. परंतु बॉक्स आॅफिसवर हे चित्रपट फारसे चालले नाहीत. तरीही जॅकी श्रॉफ आपल्या मुलासाठी चित्रपट काढू शकला असता. परंतु त्यानेही तसा निर्णय घेतला नाही. त्याऐवजी जॅकीने साजिद नाडियादवालावर विश्वास ठेवला. हिरोपंती चित्रपटातील टायगरचे काम गौरविले गेले. हा चित्रपट हिट ठरला.

आलिया
भट्ट
चित्रपटात नवीन टॅलेंट आणणारे म्हणून भट्ट परिवाराची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. परंतु आलियाने ही पारंपरिक वाट नाकारून वेगळया वाटेने जाण्याचे ठरवले. करण जोहरसोबत स्टुडंट्स आॅफ द ईअर चित्रपटाने तिने अगदी धमाकेदार एंट्री केली.

Web Title: Star Kids' Parents Without Entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.