क्रांंती बनणार स्पेशल इंस्पेक्टर
By Admin | Updated: October 23, 2015 03:09 IST2015-10-23T03:09:18+5:302015-10-23T03:09:18+5:30
सध्या विविध वृत्तवाहिन्यांवर गुन्हेगारी जगतावर आधारित मालिकांची रेलचेल सुरू आहे. त्यात ‘लक्ष्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

क्रांंती बनणार स्पेशल इंस्पेक्टर
सध्या विविध वृत्तवाहिन्यांवर गुन्हेगारी जगतावर आधारित मालिकांची रेलचेल सुरू आहे. त्यात ‘लक्ष्य’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि नवीन केसेसची मांडणी यागोष्टींमुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी गुन्हेगारी समस्यांचे जे निराकरण केले जाते त्यातून सामान्य माणसाला समाधान मिळावे यावर मालिकेचा कटाक्ष असतो. ही मालिका रटाळवाणी होऊ नये यासाठी नवीन काही कलाकारांचा देखील यात समावेश केला जातो. सध्या नवरात्रीचा सिझन सुरू आहे, त्यामुळे एका एपिसोडमध्ये डँशिंग अभिनेत्री क्रांती रेडकर हिची स्पेशल इन्स्पेक्टर म्हणून वर्णी लागणार आहे. ती केस कशा पद्धतीने सोडविते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.