स्पृहा-सचितची बाइक रायडिंग
By Admin | Updated: March 13, 2016 02:03 IST2016-03-13T02:03:37+5:302016-03-13T02:03:37+5:30
स्टायलीश बाईकवर बसून मस्तपैकी कुठेतरी लाँग ड्राईव्हला जावे असे तर प्रत्येकालाच वाटत असते. चित्रपटांमध्ये असे बाईकवरचे रोमँटिक सीन्स आपल्याला सर्रास पाहायला मिळतात.

स्पृहा-सचितची बाइक रायडिंग
स्टायलीश बाईकवर बसून मस्तपैकी कुठेतरी लाँग ड्राईव्हला जावे असे तर प्रत्येकालाच वाटत असते. चित्रपटांमध्ये असे बाईकवरचे रोमँटिक सीन्स आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. बाईकवर बसलेला हिरो अन् त्याला घट्ट मिठी मारून मागे बसलेली हिरोईन अशाप्रकारचे अनेक सीन्स आपल्याला चित्रपटांंमध्ये दिसतात. पण आता रोमँटिक हिरो सचित पाटील आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी या दोघांनीही बाईक रायडिंगचा चांगलाच पुरेपूर आनंद घेतला आहे. रेड कलरच्या बाईकवर बसून दोघेही कुठे तरी चालले आहेत. सचितने ब्लॅक टी शर्टवर व्हाईट रंगाचा शर्ट घातला आहे, तर स्पृहाने थ्रीफोर्थ जीन्स आणि यलो कलरचा स्टनिंग टॉप वेअर करून एकदम ग्लॅमरस लुक केला आहे. या दोघांच्याही भन्नाट बाईक रायडिंगला आपण एवढेच सांगू, की सचित जरा जपूनच रायडिंग कर.