प्रभासच्या 'सालार'च्या टीझरने 'टाइगर ३' आणि 'गदर २'ला टाकलं मागे, बनवला हा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:18 PM2023-11-09T12:18:56+5:302023-11-09T12:19:25+5:30

Saalar : प्रभासचा सालार: भाग १ सीझफायर चित्रपट २२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prabhas' 'Saalar' Teaser Beats 'Tiger 3' and 'Gadar 2', Creates Record | प्रभासच्या 'सालार'च्या टीझरने 'टाइगर ३' आणि 'गदर २'ला टाकलं मागे, बनवला हा रेकॉर्ड

प्रभासच्या 'सालार'च्या टीझरने 'टाइगर ३' आणि 'गदर २'ला टाकलं मागे, बनवला हा रेकॉर्ड

२०२३ या वर्षात सिनेमॅटिक संघर्ष पाहायला मिळाला जो इतर कोणत्याही वर्षांपेक्षा वेगळा होता. ब्लॉकबस्टर टीझर्स आणि ट्रेलर्सनी लार्जर दॅन लाइफ अॅक्शन, ड्रामा आणि मनोरंजनाचे आश्वासन दिले. यात प्रभास स्टारर 'सालार'चा समावेश आहे. या वर्षातील सर्वात प्रभावी टीझर म्हणून सालार भाग १ - सीजफायर अमिट छाप सोडण्यात यशस्वी झाला. केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आलेला 'सालार: भाग १ - सीझफायर'चा टीझर, लोकांना एक दृश्य अनुभव सादर करण्यात आला जो अगदी परिपूर्ण होता. 

सालार भाग १-सीझफायरच्या टीझरने यावर्षीच्या सुरुवातीपासून रिलीज झालेल्या आणि आगामी चित्रपटांच्या टीझरला मागे टाकले आहेत. यात डंकी, टाइगर ३, गदर २ आणि जेलर यांचा समावेश आहे. सालारच्या टीझरने फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकलीत. प्रशांत नीलच्या दमदार कथाकथनासह प्रभासने त्याचा करिष्मा आणि स्क्रीन प्रेझेन्ससह एक टीझर तयार केला जो सिनेमाच्या भव्यतेचे प्रतीक होता. लिओने २४ तासांत २४ दशलक्ष व्ह्यूज मिळवले, तर डंकी ड्रॉप १ ने २४ तासांत ७२ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आणि गदर २च्या ट्रेलरला ४१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले, सालार: भाग १ - सीझफायर टीझरने अवघ्या २४ तासांत ८३ दशलक्ष व्ह्यूज मिळवत रेकॉर्ड केला.

सालार: भाग १ केवळ २४ तासांत ८३ दशलक्ष वेळा पाहिला गेला, जो हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण किती उत्सुक आहे याचा पुरावा आहे. होंबळे फिल्म्स निर्मित, सालार: भाग १ सीझफायरचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू आहेत. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Web Title: Prabhas' 'Saalar' Teaser Beats 'Tiger 3' and 'Gadar 2', Creates Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.