‘तू ही रे’च्या गाण्यांची धूम
By Admin | Updated: August 13, 2015 04:59 IST2015-08-13T04:59:40+5:302015-08-13T04:59:40+5:30
गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या ‘तु ही रे’मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. ‘गुलाबाची कळी’ या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने ‘यू-ट्युब’वर

‘तू ही रे’च्या गाण्यांची धूम
गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या ‘तु ही रे’मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. ‘गुलाबाची कळी’ या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने ‘यू-ट्युब’वर तब्बल ११ लाख हिट मिळविले आहेत. पांढऱ्या साडीतील ग्लॅमरस तेजस्विनी आणि तिच्याबरोबरचा देखणा स्वप्निल यांचे एका लग्नसमारंभातील हे गाणे आहे. ‘सईसुंदरा’ गाण्यात सई ताम्हणकरचा लूक लाजवाब आहे. या लूकमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सच्या पार्वभूमीवरील सई सध्या सोशल मीडियावर धूम माजवित आहे, तर चित्रपटातील आणखी एक गाणे ‘तोला तोला’ हे मराठीतील ‘सुपरहिट’ बनण्याच्या तयारीत आहे.