सोनमचा सोने पे सुहागा !
By Admin | Updated: May 18, 2015 23:24 IST2015-05-18T23:24:47+5:302015-05-18T23:24:47+5:30
६८व्या कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.

सोनमचा सोने पे सुहागा !
६८व्या कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यामुळे आनंदात असलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’च्या या अभिनेत्रीसाठी दुग्ध शर्करा योग जुळून आला. हॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री व सोनमच्या प्रेरणास्थानी जेन फोंडा यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. योगायोग असा की दोघींनीही गडद निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. सोनमसाठी हा क्षण म्हणजे सोने पे सुहागा ठरला.